“एचव्हीएसीआर क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अपार संधी” — योगेश गांधी

Spread the news

“एचव्हीएसीआर क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अपार संधी” — योगेश गांधी

­

 

फोटो ओळी :तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात इशरे (ISHRAE) विद्यार्थी शाखेचा पुनर्स्थापना सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित, . अवेसअहमद हुसेनी, योगेश गांधी,प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे व विद्यार्थी

  •  

कार्यक्रमाची सुरुवात फॅकल्टी अ‍ॅडव्हायझर प्रा. आतिश चव्हाण यांनी मान्यवरांच्या स्वागताने केली. यावेळी मार्गदर्शन करताना योगेश गांधी यांनी एचव्हीएसीआर क्षेत्रातील करिअर संधींचा वेध घेत “हे क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी निर्माण करणारे असून विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा,” असे सांगितले.

एचव्हीएसीआर म्हणजे हीटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग, ही एक तंत्रज्ञान प्रणाली आहे जी बंद जागेत, जसे की घर, कार्यालय किंवा वाहनांमध्ये तापमान, आर्द्रता आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित करते। हे प्रणाली उष्णता, थंडी आणि हवा खेळती ठेवण्याचे काम करते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अवेसअहमद हुसेनी (अध्यक्ष, कोल्हापूर इशरे चॅप्टर), योगेश गांधी (प्रेसिडेंट-इलेक्ट) तसेच खजिनदार विजय पाटील उपस्थित होते. तज्ज्ञ व्याख्यानासाठी डॉ. वंदना पुसाळकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक, प्रा. जी. एस. कांबळे यांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजीनी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तर डॉ. हुसेनी यांनी पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन विद्यार्थी शाखेच्या पुनर्स्थापनेची अधिकृत घोषणा केली.
यानंतर डॉ. वंदना पुसाळकर यांनी “ब्लू-ग्रीन सिनर्जी” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान देत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची दिशा दाखवली.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी अध्यक्षा, सलोनी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!