*गहिनीनाथ गैबी पीर चरणी कागल सिनियर घाटगे घराण्याचा मानाचा चौथा गलेफ विधीवत अर्पण*
*राजे समरजितसिंह घाटगे,राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात गलेफ*
कागल, प्रतिनिधी
येथील ऐतिहासिक श्री गहिनीनाथ गैबी पीर उरूस सोहळ्याच्या निमित्ताने कागल सिनियर घाटगे घराण्याचा मानाचा व पारंपरिक चौथा गलेफ विधीवत अर्पण करण्यात आला.शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात गलेफ अर्पण केला.
उरूसातील आजचा मुख्य दिवस म्हणून ओळखला जातो.या दिवशी अर्पण होणारा चौथा गलेफ अत्यंत मानाचा मानला जातो.गेल्या अनेक वर्षांपासून हा मान कागल सिनियर घाटगे घराण्याचा असून, राजपरिवारातील सदस्यांच्या हस्ते व नागरिकांसह भाविक भक्तांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात,फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिमय वातावरणात हा विधी पार पडला.
या वेळी शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी कागल नगरपालिकेचे नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गलेफ अर्पणानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री गहिनीनाथ गैबी पीर चरणी नतमस्तक होऊन भावपूर्ण प्रार्थना केली.
छायाचित्र: कागल येथील गहिनीनाथ गैबी पीर उरूसानिमित्त कागल सिनियर घाटगे घराण्याचा मानाचा चौथा गलेफ अर्पण करताना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,राजे वीरेंद्रसिंह घाटगे



