महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आपण सर्वांनी कामाला प्रतिष्ठा अर्पण करण्याची प्रतिज्ञा करूया..!……..आमदार डॉ विनय कोरे सावकर.

Spread the news

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आपण सर्वांनी कामाला प्रतिष्ठा अर्पण करण्याची प्रतिज्ञा करूया..!……..आमदार डॉ विनय कोरे सावकर.

­

 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कामगार आणि शेतकरी केंद्रस्थानी होते याच दोन घटकांवर वारणेचा विकासवृक्ष सर्वच क्षेत्रात बहरत आहे…. ——आमदार डॉ विनय कोरे सावकर.

  •  

महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमधील शेतकरी आणि कामगार हेच वारणेच्या सर्वांगीण क्षेत्रातील विकासामध्ये केंद्रस्थानी …..आमदार डॉ विनय कोरे सावकर……

श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहामध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये कामगार आणि शेतकरी हे दोन महत्त्वाचे घटक कार्यरत होते आणि वारणा समूहाच्या भरभराटीमध्ये सुद्धा कामगार आणि शेतकरी हेच घटक केंद्रस्थानी असल्याचे प्रतिपादन या सोहळ्याप्रसंगी केले…..
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही व्ही कारजिन्नी यांनी केले या संपूर्ण स्पर्धा योजनांमध्ये ज्या समित्यांनी काम केले त्या सर्वांचे अभिनंदन केले …..सर्व स्पर्धा अतिशय स्पर्धात्मक वातावरणात खेळाडू वृत्तीने संपन्न केल्याबद्दल सर्वच विभाग प्रमुखांचे काम आदर्शवत असल्याच असल्याचा उल्लेख त्यांनी केला….

शिक्षण मंडळ परिसरामध्ये आज सकाळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण आमदार डॉ विनय कोरे सावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या वेळेला वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ व्ही व्ही कारजिन्नी….. वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के
, तात्यासाहेब कोरे दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे चेअरमन एच आर जाधव …..तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ एस आर भगत….. वारणा समूहातील सर्वच सहकारी संस्थांचे पदाधिकारी संचालक व विविध विद्याशाखांचे प्रमुख , कामगार या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास चौगुले यांनी केले तर आभार स्पर्धा विभाग प्रमुख प्रितीश पाटील यांनी व्यक्त केले…..

यामध्ये महिला आणि पुरुष यांच्या गटामधील विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या ……त्याचे निकाल पुढीलप्रमाणे
100 मीटर धावणे 35 वर्षाखालील महिला विभाग
आसावरी सूर्यवंशी तृतीय स्नेहल भोसले द्वितीय
ऋतुजा पाटील प्रथम
100 मीटर धावणे 35 वर्षांवरील विभाग
सीमा कांबळे तृतीय स्वाती पाटील द्वितीय विजया गोडबोले प्रथम ..
400 मीटर धावणे 35 वर्षाखालील विभाग ऋतुजा पाटील तृतीय सायली पाटील द्वितीय स्नेहल भोसले प्रथम क्रमांक …
400 मीटर धावणे 35 वर्षावरील विभाग
राणी शिंदे तृतीय ज्योती केकरे द्वितीय विजया गोडबोले प्रथम क्रमांक..

संगीत खुर्ची
तृतीय क्रमांक हौसा मोरे द्वितीय क्रमांक शोभा ऐवळे प्रथम क्रमांक अर्चना डोईजड ..
लिंबू चमचा स्पर्धा तृतीय क्रमांक राणी शिंदे द्वितीय क्रमांक चैत्राली सावंत प्रथम क्रमांक ऋतुजा पाटील .
बुद्धिबळ स्पर्धा
अरुणा महाजन तृतीय दिपाली देवकर द्वितीय संगीता डोईजड प्रथम …
महिला बॅडमिंटन स्पर्धा
सुनीता पाटील उत्तेजनार्थ प्रीती कापरे तृतीय रूपाली सावंत द्वितीय सुप्रिया काटे प्रथम

रस्सीखेच स्पर्धा महिला
तृतीय क्रमांक महिला गृह उद्योग लिज्जत पापड वारणा भगिनी मंडळ वारणानगर ,द्वितीय क्रमांक श्री वारणा सहकारी ग्राहक सेवा मंडळ वारणा बझार ,प्रथम क्रमांक वारणा विभाग शिक्षण मंडळ
अंताक्षरी स्पर्धा
तृतीय क्रमांक वारणा बझार वारणानगर,
द्वितीय क्रमांक सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्था, प्रथम क्रमांक वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर.
बुद्धिबळ पुरुष विभाग
संग्राम कणसे तृतीय क्रमांक, विकास मिनेकर द्वितीय क्रमांक, भारत पाटील प्रथम क्रमांक.

बॅडमिंटन पुरुष विभाग
वारणा दूध संघ तृतीय क्रमांक, वारणा साखर तृतीय क्रमांक ,वारणा विभाग शिक्षण मंडळ द्वितीय क्रमांक, जनसंपर्क कार्यालय वारणानगर प्रथम क्रमांक.
हॉलीबॉल
तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना तृतीय क्रमांक, ऊर्जांकुर वारणानगर द्वितीय क्रमांक, वारणा विभाग शिक्षण मंडळ प्रथम क्रमांक.
कबड्डी
वारणा विभाग शिक्षण मंडळ व वारणा ऍग्रो तृतीय क्रमांक, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना द्वितीय क्रमांक, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ प्रथम क्रमांक.

रस्सीखेच
ऊर्जांकुर वारणा तृतीय क्रमांक, तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना द्वितीय क्रमांक, तात्यासाहेब कोरे दूध उत्पादक प्रक्रिया संघ प्रथम क्रमांक.
क्रिकेट
ऊर्जांकुर वारणा तृतीय क्रमांक, वारणा विभाग शिक्षण मंडळ द्वितीय क्रमांक, तात्यासाहेब कोरे दूध उत्पादक प्रक्रिया संघ प्रथम क्रमांक,उत्कृष्ट बॉलर सचिन पाटील वारणा ऍग्रो ,उत्कृष्ट बॅट्समन तुषार पाटील वारणा साखर, मालिकावीर संजय जमदाडे वारणा विभाग शिक्षण मंडळ…

उत्कृष्ट खेळाडू गजानन केकरे वारणा साखर यावर्षीचा जनरल चॅम्पियनशिप चषक तात्यासाहेब कोरे दूध उत्पादक प्रक्रिया संघ यांनी पटकावला या संपूर्ण सोहळ्याचे पुरस्कार वितरण आमदार डॉ विनय कोरे सावकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले…..


Spread the news

You may also like

error: Content is protected !!