Spread the news

नुकतीच निवडणूक झालेल्या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल पॉंडिचेरी व आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार मित्र पक्षांसोबत सत्तेत आले आहे.या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपच्यावतीने शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत सुळकूड ता. कागल येथे पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील पंचायत समितीच्या सदस्या तेजस्विनी भोरे राजे बँकेचे संचालक अमोल शिवई रणदिवेवाडी वचे सरपंच राहुल खोत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राजेसमरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा कोट-

­

 

नुकतीच निवडणूक झालेल्या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल पॉंडिचेरी व आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार मित्र पक्षांसोबत सत्तेत आले आहे.विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा गड ढासळून भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा तर आसाम मध्ये दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे.तसेच केरळ आणि तामिळनाडू मध्ये सुद्धा भाजपला चांगली मते मिळाली आहेत. या ऐतिहासिक व अतिशय चांगल्या निकालाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ,या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह सर्वच नेते-कार्यकर्ते व नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन करतो. या पाच राज्यातील जनतेचेही आभार मानतो. आणि भारतीय जनता पक्षाची विजयी वाटचाली यापुढेही अशीच सुरू राहील.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!