प्रा.सुधाकर मानकर यांचे निधन

Spread the news

  • प्रा.सुधाकर मानकर यांचे निधन

 

­

 

कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कॉमर्स विभागाचे माजी विभाग प्रमुख, सुटा संघटनेचे मार्गदर्शक, जागतिक प्राध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष, अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष ,माजी प्राचार्य प्रा. सुधाकर मानकर सरांचे आज वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. पंचगंगा स्मशान भूमीत त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक 12 मे रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.
मानकर सर यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,भाऊ,जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
उच्च शिक्षणातील सल्लागार, मार्गदर्शक म्हणून त्यांनी गेली 50 वर्ष काम केले आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी काम केले आहे.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कॉमर्स विभागामध्ये त्यांनी 34 वर्ष अध्यापनाचे आणि लेखन कार्य केले होते. शासनाने काढलेल्या विविध अध्यादेशांचे त्यांनी 24 पुस्तकांद्वारे संकलन, संपादन केले आहे. कॉमर्स व इतर विषयावरील त्यांनी 165 पुस्तकांचे लेखन केले आहे .
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण म्हणाले, प्रा. सुधाकर मानकर यांच्या जाण्याने प्राध्यापकांचा आश्वासक चेहरा हरपला आहे. उच्च शिक्षणातील अनेक प्रश्नांवरती त्यांनी लढा दिला आहे. विशेषतः प्राध्यापकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. अनेक पुस्तकांचे लेखन कार्य त्यांनी केले. त्यांच्या जाण्याने प्राध्यापकांचे , शहाजी महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. प्राध्यापक सुधाकर मानकर हे नेहमी सकारात्मक ऊर्जा देणार व्यक्तिमत्व होते.
ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील म्हणाले, मानकर सरांनी 165 पुस्तकांचे लेखन केले आहे. वाणिज्य शाखेतील त्यांची अनेक पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या अध्यादेशांच्या 24 पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील उच्च शिक्षणातील एक मार्गदर्शक, दीपस्तंभ होते. उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी ते अखंडपणे झटत राहीले होते.
प्रा.सुधाकर मानकर सर हे गेल्या पन्नास वर्षापासून उच्च शिक्षनातील विविध प्रश्नांवरील लढ्यात अग्रभागी होते. जागतिक प्राध्यापक महासंघाचे पाच वर्षे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोग आणि मानव संसाधन मंत्रालयास त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे.
वाणिज्य शाखेतील पदवी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी 165 पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. तसेच उच्च शिक्षणातील विविध शासकीय अध्यादेश मिळवून 24 पुस्तकांचे संपादन करून महाराष्ट्र आणि देशातील प्राध्यापकांना, विद्यापीठ स्तरावर अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.
शहाजी महाविद्यालयात 34 वर्षे प्राध्यापक, अमरावतीच्या वडनेर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. उच्च शिक्षणात मोफत सल्ला देत, निरपेक्ष भावनेने ते अखंडपणे काम करीत राहिले. त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग मंत्रालयातील सचिव पासून ते अनेक कुलगुरू प्राचार्य प्राध्यापक हजारो विद्यार्थ्यांना झालेला आहे.
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे शिवाजी ग्रंथालयात प्रदर्शन भरून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!