डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड’ ने सन्मान

Spread the news

डॉ. संजय डी. पाटील यांचा
‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड’ ने सन्मान

­

 

  •  

-उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरव

-शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा सन्मान

पुणे :
ग्रामीण भागापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचवून त्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना प्रतिष्ठित ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. ग्रामीण शिक्षण परिवर्तनाच्या या कार्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते डॉ. पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवभारत -नवराष्ट्र च्या वतीने पुण्यातील हयात रीजेन्सी येथे ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड’ सोहळा संपन्न झाला. आपल्या कार्यातून सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या व सामाजिक ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीमत्वांना यावेळी सन्मानित करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला.

यावेळी रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रांट, नवभारतचे ग्रुप एडिटर संजय तिवारी, प्रेसिडेंट ए. श्रीनिवासन, सुशील मोझर, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि तीन विद्यापीठांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक शिक्षण संस्थांमधून ४७ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून लाखो विद्यार्थी पास आऊट झाले आहेत. विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला आकार देण्याचे कार्य डॉ. पाटील अविरतपणे करत आहे.

त्याचबरोबर डॉ. पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी प्रयोग यामध्यमातूनही शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. समाजहितासाठी विशेषत: शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठी करत असलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण, कृषी व सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. हा सन्मान आपल्या सहकाऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि समाजाच्या विश्वासाचा आहे. समाजासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाली आहे.

– डॉ. संजय डी. पाटील
अध्यक्ष डी. वाय. पाटील ग्रुप.

 

पुणे: डॉ. संजय डी. पाटील यांना ‘सोशल इम्पॅक्ट ॲवॉर्ड’ने सन्मानित करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. समवेत डॉ. परवेझ ग्रांट, संजय तिवारी, ए. श्रीनिवासन, सुशील मोझर आदी.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!