लिंगायत माळी समाजा वतीने 13 जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ
कोल्हापूर
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व विविध पुरस्कारांचे वितरण येत्या शनिवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. बिंदू चौक येथील अक्कमहादेवी मंटप येथे हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्ह्यातील लिंगायत माळी समाजातील विद्यार्थ्यांचा दरवर्षी प्रमाणे यंदाही सत्कार केला जाणार आहे. याशिवाय आदर्श माता, आदर्श कुटुंब व समाज रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजातील व्यक्तींचा सत्कारही या दिवशी करण्यात येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले मार्कलिस्ट तातडीने संचालकांच्याकडे जमा करावे तसेच या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.





