आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड युवराज संभाजी छत्रपती महाराज
मार्गदर्शक
प्रेस नोट दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून रोजी रंगणार ‘शिवराज्याभिषेक सोहळा’
६ जून १६७४ च्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा
कोल्हापूर :
दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी झालेला ‘राज्याभिषेक’ हा शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा सुवर्णपान आहे. यवनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणारा आणि शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत उजळून सार्वभौम राज्य स्थापन करणारा हा अभूतपूर्व क्षण होता. हजारो मावळ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या बलिदानातून पावन झालेल्या याच दुर्गराज रायगडावर मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या राज्याभिषेकाची द्वाही दळमळत्या दाहिदिशा फिरली होती. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी, याच हेतूने प्रतिवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
याच ऐतिहासिक परंपरेला जपत, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ आणि ६ जून २०२६ रोजी ‘शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन ६ जून लोकोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. हा सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा..’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सविस्तर रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
शुक्रवार, दि. ५ जून २०२६ (पहिला दिवस)
दुपारी ३:३० वा. – पाचाड येथील राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्यास प्रारंभ होईल.
दुपारी ४:०० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे नाणे दरवाजा येथे भव्य स्वागत व शिवभक्तांसह पायी गड चढण्यास प्रारंभ.
दुपारी ४:१५ वा. – नगारखाना येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत गडपूजन.
दुपारी ४:३० वा. – युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते ‘धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची…’ या यद्धकलेच्या प्रात्यक्षिकास होळीचा माळ येथे प्रारंभ..
सायंकाळी ७:०० वा. – होळीचा माळ येथे डोलवादन, लेझीम प्रात्यक्षिके व वारकरी संप्रदायाकडून टाळ-मृदंगाचा गजर.
रात्री ८:०० वा. – राजसदर येथे ‘जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा…’ हा शाहिरी कार्यक्रम.
रात्री ९:०० वा. – शिरकाई मंदिर येथे गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ.
रात्री ९:३० वा. – जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन.
शनिवार, दि. ६ जून २०२६ (मुख्य दिवस)
सकाळी ७:०० वा. – नगारखाना येथे युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण.
सकाळी ७:३० वा. – राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम.
सकाळी ९:३० वा. – श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदर येथे आगमन.
सकाळी ९:५० वा. – युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरवर आगमन.
सकाळी १०:०० वा. – युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक, तसेच राजसदरवरील सिंहासनाढूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक होईल.
सकाळी १०:२० वा. – युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना जाहीर संबोधन.





