निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळे

Spread the news

निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळे

­

 

  •  

कोल्हापूर, दि. २ः “निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून, ती प्रत्येकाने आरोग्य व अध्यात्म शिबिराच्या माध्यमातून प्राप्त करावी,” असे प्रतिपादन .महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांनी केले.ते मानस योग साधना परिवार कोल्हापूर तर्फे आयोजित आरोग्य व अध्यात्म शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते . जय पॅलेस सांस्कृतिक भवनयेथे हे दि. २ जून २०२६ ते सोमवार, दि. ८ जून २०२६ या सात दिवसा च्या कालावधीत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये निरोगी जीवनशैली, सूक्ष्म व्यायाम, योग्य आहारपद्धती, शरीरशुद्धी, तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मेरठ (उत्तर प्रदेश) येथील योग व आरोग्य तज्ज्ञ डॉ. गोपाल शास्त्री हे सात दिवस शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. भरत रसाळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक नेते सुधाकर सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी शिबिर आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना यापूर्वीच्या शिबिरांमधून मिळालेले सकारात्मक अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी प्रभाकर हेरवाडे, आर. डी. पाटील, राजेश वरक, उमेश देसाई, बाबासाहेब लाड, संदीप जाधव, विठ्ठल दुर्गुळे, जोतिबा जाधव, सुनील पाटील, महादेव डावरे, अनिल शेलार, शकुंतला मोरे, चारुलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये सांगली बेळगांव कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे २५० शिबिरार्थीं शिक्षक बंधू भगिनीनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कडगावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय पाटील यांनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!