कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास (SPA) ४२ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्याबाबत पुनर्विचार करून, कोल्हापूर शहर हद्दवाढीचा मार्ग मोकळा करा
संजय पवार वाईकर यांची मागणी
कोल्हापूर
शासनाने कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास ४२ गावांसाठी घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयामुळे भविष्यात कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यास गंभीर अडथळे निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (MRTP Act १९६६) अंतर्गतः कलम ४० नुसार विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) घोषित करण्याचा अधिकार शासनाला आहे. परंतु, एकाच क्षेत्रावर नगरपालिका/महानगरपालिका व SPA या दोन्ही संस्थांचे नियोजन अधिकार आल्यास प्रशासनिक संघर्ष निर्माण होऊ शकतो,
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गतः
शहर हद्दवाढ ही नागरी विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया आहे.
SPA घोषित केल्यास संबंधित गावे नगरपालिकेत समाविष्ट करण्यास अडथळा योणार आहे राज्य शासनाने पूर्वी घेतलेल्या निर्णयांमध्ये (precedents) असे दिसून येते की, SPA लागू असलेल्या क्षेत्रात महानगरपालिका हद्दवाढ प्रलंबित राहते किंवा विलंबित होते.
प्रशासनिक व सामाजिक परिणामः
कोल्हापूर शहराच्या नैसर्गिक वाढीवर मर्यादा येईल. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी सुविधा (पाणी, रस्ते, स्वच्छता) मिळण्यात विलंब होईल. दुहेरी प्रशासनामुळे (SPA + नगरपालिका) नागरिकांना अडचणी निर्माण होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी होतील.
आमच्या मागण्याः
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला ४२ गावांसाठी SPA म्हणून घोषित करण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात यावा. सदर निर्णयाचा पुनर्विचार करून, शहर हद्दवाढीचा प्रस्ताव प्राधान्याने राबवावा. संबंधित गावांना टप्प्याटप्प्याने कोल्हापूर महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करावी. आवश्यक असल्यास,. चठढझ अलीं मधील कलम ४० च्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा आदेश द्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचा अभिप्राय घेऊन अंतिम निर्णय घ्यावा.
वरील बाबींचा विचार करून, शासनाने SPA संदर्भातील निर्णयाचा पुनर्विचार करून कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासात्साठी योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. तसेच दि. ०८/०६/२०२६ रोजी प्राधिकरण संदर्भात आढावा बैठक होणार आहे त्यामध्ये ही हा विचार व्हावा तसेच हद्द वाढीचा निर्णय जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत SPA स्थापन करू नये अशी मागणी श्री छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष संजय पवार वाईकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे



