द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), कोलकाता तर्फे एआयएसएसएमएद इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), कोलकाता तर्फे एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती

Spread the news

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), कोलकाता तर्फे
एआयएसएसएमएद इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), कोलकाता तर्फे
एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती
पुणे : एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार (E&TC) अभियांत्रिकी विभागातील सहा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, समर्पण आणि तांत्रिक कौशल्याची दखल घेऊन द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), कोलकाता यांच्याकडून प्रतिष्ठेची राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
दर्शन देवरे (SE E&TC)
नेहा काकडे (SE E&TC)
विश्वराज पाटील (TE E&TC)
तनमय झुरुळे (TE E&TC)
सुप्रिया चव्हाण (BE E&TC)
रोशनी मोरे (BE E&TC माजी विद्यार्थीनी)
विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी आणि समर्पणाचे हे यश द्योतक असून संस्थेसाठी हा आणखी एक अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.
याप्रसंगी एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक यशाचे कौतुक केले. एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे यांनी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देत भविष्यातही शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढविल्याबद्दल एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सहसचिव श्री. सुरेश प्रताप शिंदे, खजिनदार श्री. अजय पाटील तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅड. भगवानराव बाबुराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी श्री. ए. बी. भोसले हे देखील उपस्थित होते.
आयईआय स्टुडंट्स चॅप्टरचे प्राध्यापक सल्लागार प्रा. एन. पी. मवाळे आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. बी. धोंडे यांनी विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.स अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती
पुणे : एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार (E&TC) अभियांत्रिकी विभागातील सहा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, समर्पण आणि तांत्रिक कौशल्याची दखल घेऊन द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), कोलकाता यांच्याकडून प्रतिष्ठेची राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
दर्शन देवरे (SE E&TC)
नेहा काकडे (SE E&TC)
विश्वराज पाटील (TE E&TC)
तनमय झुरुळे (TE E&TC)
सुप्रिया चव्हाण (BE E&TC)
रोशनी मोरे (BE E&TC माजी विद्यार्थीनी)
विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी आणि समर्पणाचे हे यश द्योतक असून संस्थेसाठी हा आणखी एक अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.
याप्रसंगी एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक यशाचे कौतुक केले. एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे यांनी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देत भविष्यातही शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढविल्याबद्दल एआयएसएसएमएस संस्थेचे मानद सहसचिव श्री. सुरेश प्रताप शिंदे, खजिनदार श्री. अजय पाटील तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅड. भगवानराव बाबुराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी श्री. ए. बी. भोसले हे देखील उपस्थित होते.
आयईआय स्टुडंट्स चॅप्टरचे प्राध्यापक सल्लागार प्रा. एन. पी. मवाळे आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. बी. धोंडे यांनी विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

­

Spread the news

You may also like

error: Content is protected !!