सचिन घोरपडे यांच्या उमेदवारीसाठी ७६ ठराव जमा; जीवन पाटील व सचिन घोरपडे यांचे शक्तिप्रदर्शन

Spread the news

सचिन घोरपडे यांच्या उमेदवारीसाठी ७६ ठराव जमा; जीवन पाटील व सचिन घोरपडे यांचे शक्तिप्रदर्शन

­

 

ही निवडणूक महायुती विरोध कष्टकरी दूध उत्पादक मी कष्टकरी दूध उत्पादकांच्या पॅनलमध्ये – सतेज पाटील

  •  

कोल्हापूर प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध तालुक्यांतून ठरावधारक जमा करण्यासाठी उमेदवार व नेत्यांची लगबग सुरू झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातून सचिन घोरपडे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ बिद्रीचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन (दादा) पाटील आणि बाजार समितीचे माजी संचालक सचिन (दादा) घोरपडे यांनी एकूण ७६ ठराव काँग्रेस नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

या ठराव सादरीकरणातून भुदरगड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सचिन घोरपडे यांच्या उमेदवारीला असलेला पाठिंबा अधोरेखित झाला. तसेच आगामी गोकुळ निवडणुकीत भुदरगड तालुक्यातील संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या वेळी सतेज पाटील बोलताना म्हणाले
“ही निवडणूक महायुती विरुद्ध कष्टकरी दूध उत्पादकांची आहे. मी कष्टकरी दूध उत्पादकांच्या पॅनलमध्ये असून शेतकरी, दूध उत्पादक आणि सहकार वाचवण्यासाठी ही लढाई लढत आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांकडून ठराव संकलन आणि राजकीय शक्तिप्रदर्शनाला वेग आला असून, येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या राजकारणाला आणखी रंग चढण्याची चिन्हे आहेत.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य एस.एम.पाटील,संजय सरदेसाई, गजानन शिंदे, एन.के.देसाई भास्कर देसाई,माजी जिल्हा परिषद सदस्य एस एम पाटील, खानापूरचे माजी सरपंच भुजंगराव मगदूम,अमर बरकाळे,नेताजी आरडे, दिलीपराव केणे,अमोल गोजरे,सागर देसाई,विक्रम पाटील, चंद्रकांत मोहिते,रामचंद्र डऊर, यांच्यासह भुदरगड तालुक्यातील ठराव धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!