वैद्यकीय प्रतिपूर्तीची माहिती तात्काळ द्या : राजेंद्र कोरे

Spread the news

वैद्यकीय प्रतिपूर्तीची माहिती तात्काळ द्या : राजेंद्र कोरे

­

 

कोल्हापूर, दि. २१ (प्रतिनिधी) : राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळावी, यासाठी महानगरपालिकांकडून देय असलेल्या ३३.३३ टक्के रकमेबाबतची माहिती तात्काळ शासनाकडे सादर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्याकडे केली आहे.

  •  

महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती करताना ६६.६६ टक्के रक्कम शासन स्तरावरून आणि ३३.३३ टक्के रक्कम संबंधित महानगरपालिकांकडून देण्याचे आदेश आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना केवळ ६६.६६ टक्केच प्रतिपूर्ती मिळत असून, उर्वरित ३३.३३ टक्के रक्कम महानगरपालिकांकडून दिली जात नसल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे महासंघाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

यासंदर्भात राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी यापूर्वी २३ ऑगस्ट २०१९ रोजी तसेच १७ जुलै २०२६ रोजी पत्र काढून, राज्यातील कोणत्या महानगरपालिका ३३.३३ टक्के वैद्यकीय प्रतिपूर्ती देत आहेत किंवा देत नाहीत, याबाबतची माहिती २५ जुलै २०२६ पर्यंत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इचलकरंजी महानगरपालिकांकडून संबंधित माहिती तातडीने शासनाकडे पाठविण्यासाठी संबंधित प्रशासनाधिकाऱ्यांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी राजेंद्र कोरे यांनी केली आहे.

फोटो : शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना निवेदन देताना महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे सोबत दिलीप माने,सूर्यकांत डवर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!