क्रीडाई कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात मुंबईत निर्णायक बैठक

Spread the news

*क्रीडाई कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात मुंबईत निर्णायक बैठक*

­

*सातबारा, रेडी रेकनर, कन्व्हेयन्स डीड व प्रॉपर्टी कार्डसंदर्भातील मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश*

  •  

क्रीडाई (CREDAI) कोल्हापूरच्या विविध प्रलंबित विषयांवर महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात मुंबई येथे व्यापक बैठक पार पडली.आमदार अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.बैठकीत क्रीडाई कोल्हापूरच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या मागण्यांची सकारात्मक दखल घेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डाॕ.विजय राठोड यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती क्रेडाई अध्यक्ष के पी खोत यांनी दिली.

बैठकीत खरेदी दस्ताची नोंदणी झाल्यानंतर सातबारा उतारा स्वतंत्र अर्ज, फेरफार नोटीस व अनावश्यक कागदपत्रांशिवाय ऑनलाइन पद्धतीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि शासकीय कार्यालयांतील दिरंगाई कमी होण्यास मदत होईल, असे नमूद करण्यात आले.
स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांना भोगवटादार वर्ग-२ मधील जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याबाबतच्या शासन निर्णयाचा लाभ देण्याची मागणीही करण्यात आली.
रेडी रेकनरमधील फुटनोट UDCPR नुसार अद्ययावत करणे, कन्व्हेयन्स डीड करताना शिल्लक चटई क्षेत्रावरील मुद्रांक शुल्क माफ करणे तसेच कोल्हापूर शहरातील बिगरशेती झालेल्या जमिनींचे ७/१२ बंद करून तातडीने प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

चौकट
*महसूल मंत्र्यांसमोर मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या*

– खरेदी दस्त नोंदणीनंतर सातबारा ऑनलाइन व तातडीने मंजूर करणे.
– UDCPR नुसार रेडी रेकनरमधील फुटनोटमध्ये आवश्यक बदल करणे.
– कन्व्हेयन्स डीड करताना शिल्लक चटई क्षेत्रावरील मुद्रांक शुल्क माफ करणे.
– कोल्हापूर शहरातील बिगरशेती जमिनींचे ७/१२ व प्रॉपर्टी कार्ड बंद करून तातडीने प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आदेश जारी करणे.

फोटो ओळ :
मुंबई : महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत क्रीडाई कोल्हापूरच्या विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करताना आमदार अमल महाडिक,शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, महाराष्ट्र क्रेडाई चे उपाध्यक्ष विधानंद बेड़ेकर माजी अध्यक्ष महेश यादव निखिल शहा संदीप पोवार वीरेंद्र घाटगे नगरसेवक माने विजयेंद्र ई पदाधिकारी. सत्यजित कदमउपस्थित होते

Spread the news

You may also like

error: Content is protected !!