गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा – माणिक पाटील (चुयेकर)
कोल्हापूर – सहकार कायद्यातील निवडणुक विषयक नियमामुळे कोल्हापूर सर्किट बेंचने ठरवून दिलेल्या ९० दिवसांच्या कालावधीत गोकुळची निवडणुक घेणे शक्य नाही. यामुळे या निवडणुकीसाठी विभागीय सहकार उपनिबंधकांना आवशक तो कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी श्रीराम दूधसंस्था, चुये चे संचालक, पदवीधर मित्र माणिक पाटील (चुयेकर) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे. फडणवीस सरकार दीर्घकाळासाठी स्वतःच्या सोयीच्या लोकांचे खासगी प्रशासक मंडळ गोकुळवर नेमल या अनावश्यक भीतीपोटी मागील संचालक मंडळाने, संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर लगेचच निवडणुक घेण्याची मागणी उच्य न्यायालयात केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने निवडणुका ९० दिवसाच्या आत घेण्याचा निर्णय दिला होता. परंतु सहकार कायद्यातील निवडणुकविषयक नियमानुसार या निवडणुक प्रक्रियेस आवश्यक तो कालावधी न दिल्यास गोकुळ निवडणुकीचा अंतिम निकाल कायद्याच्या कचाट्यात आडकून काही सभासद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातील. यामुळे नविन संचालक मंडळ स्थापन होण्यास प्रदीर्घ कालावधी जाईल असे प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे.




