कोल्हापुर सर्किट बेंच अधिसूचनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पदवीधर मित्रच्यावतीने शहरात साखर वाटप
कोल्हापूर दि.०१ : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुर सर्किट बेंच (खंडपीठ) सुरू करण्याची अधिकृत अधिसुचना दि.०१ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आली. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पदवीधर मित्र च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर व रेशन धान्य दुकान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरातील ऐतिहासिक बसरा चौकात साखर बाटून वर्षपूर्ती आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापुर सर्किट बेंच (खंडपीठ) साठी गेली सुमारे ४० वर्षे वकिल, पक्षकार, वेगवेगळे राजकीय पक्ष व सामाजिक संघटना तसेच या कार्यक्षेत्रातील सर्वच जनतेच्या वतीने विविध आंदोलने झाली. गेल्या फेब्रुवारी २०२५ मध्ये माणिक पाटील यांनी यासाठी कोल्पुरातील दसरा चौकात केलेल्या ९ दिवसाच्या अमरण उपोषणाची सांगता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठाबाबत ठोस आश्वासन दिलेनंतरच, पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे हस्ते करण्यात आली. कोल्हापुर खंडपीठाबाबतचे हे शेवटचे आंदोलन ठरले. खंडपीठ सुरू आल्यामुळे गेल्या वर्षभरात कोल्हापुरला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या वर्षपूर्ती आनंदोत्सव सोहळ्यात मुस्लिम बोर्डीगचे कादरभाई मलबारी, संविप नष्टे, पी.एस. जाधव, प्रशांत कुलकर्णी, रविंद्र पाटील-यवतीकर, आर. एम. पाटील, प्रकाश हिरेमठ, किशोर खेडेकर, नागेश राणे, राजन जाधव, प्रदिप शेलार, सुनिल थोरवत, राजू बंडगरल, विशाल इंगवले, ऋतुराज शेलार आदी सहभागी झाले होते.




