सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी विरोधात मोर्चा निघणार

Spread the news

*सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी विरोधात मोर्चा निघणार*
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच माजी सैनिक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीबाबत घुमजाव.
नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात टाकळी पंचक्रोशीतील नागरिकांचा आमदारांच्या कार्यालयावर पायी मोर्चा निघणार आहे. त्या अनुषंगाने
आज जयसिंगपूर येथे सैनिक टाकळी जलजमीन जीवन बचाव कृती समीती व तालुक्यातील समविचारी संघटना पक्ष यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
2023 पासून सैनिक टाकळी ग्रामपंचायतने सदरची एमआयडीसी रद्द करावी यासाठी ठराव करून सर्व विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे .हे सगळं आमदारांना माहीत असताना सदरची एमआयडीसी या भागावर लादली जात आहे .
गेली दोन महिन्यापासुन हे आंदोलन सुरू असताना नागरिकांचा विरोध डावलून आमदारांच्या दबाव पोटी प्रशासनाकडून एमआयडीसी बाबतची प्रक्रिया पुढे सरकवली जात आहे.
परवा आमदार साहेबांनी गावातील त्यांच्या गटाचे काही कार्यकर्ते घेऊन मीटिंग घेतली आणि त्यामध्ये मी एमआयडीसीही करणार आणि विकासही करणार असं विधान केलं होतं. आंदोलनकर्त्यांनी त्या विधानाच खंडन करत एमआयडीसी व विकास या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही तर इथल्या लोकांची मागणी एमआयडीसी रद्दची आहे त्यानंतर तुम्हाला पुढील पाच वर्षे काय विकास करायचा ते करा आणि शिल्लक राहिला तर पुढची टर्म सुद्धा तुम्हीच आमदार व्हा आणि पूर्ण करा.
पण पहिल्यांदा एमआयडीसी रद्द ची घोषणा करा. त्यामुळे आमदारांनी एमआयडीसी रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा खुर्ची खाली करा असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. मोर्चामध्ये सैनिक टाकळी पंचक्रोशीतील माजी सैनिक पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर महिलावर्ग तसेच शेतकऱ्यांची वाहन ट्रॅक्टर बैल जोड्या या सुद्धा यामध्ये सामील होणार आहेत. त्यानुसार गावागावांमध्ये बैठका सुरू आहेत.
मोर्चासाठी तालुक्यातील सर्वच समविचारी पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे नऊ ऑगस्ट चा मोर्चा हा न भुतो न भविष्यती अशा प्रकारे निघणार असल्याच सांगण्यात आले .
यावेळी या बैठकीला माजी सैनिक रिटा.कॅप्टन प्रकाश खोत, लेफ्टनंट विजय गायकवाड, आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील , शंकर नाळे ,सकल मराठा समाजाचे चंद्रकांत जाधव ,अमर पाटील, रिटा. वायुसैनिक अमर पाटील, राकेश जगदाळे, नितीन पाटील, नवनाथ पाटील, उदय होगले इ. उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!