सैनिक टाकळीची प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्यासंदर्भात उद्योग मंत्री नामदार उदयजी सांमत यांची सांगली येथे भेट

Spread the news

*सैनिक टाकळीची प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्यासंदर्भात उद्योग मंत्री नामदार उदयजी सांमत यांची सांगली येथे भेट*
सांगली येथे शिवसेना शिंदे सेनेचे पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भारतीय सैन्य दलासाठी रक्तदान शिबिर दिल्ली येथे आयोजित केले आहे त्यानिमित्त सांगली रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री नामदार उदयजी सांमत सांगलीमध्ये आलेले होते. त्यावेळी गुरुवर्य भिडे गुरुजी आणि शिंदे गटाचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, विशाल पाटील यांनी टाकळीतील माजी सैनिक शेतकरी यांच्या शिष्टमंडळांची सांगली रेल्वे स्टेशनच्या विश्रामगृहात भेट घडवून आणली.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी एमआयडीसी रद्द व्हावी यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान नऊ तारखेच्या मोर्चा आधी बैठकीचे पत्र द्यावं आणि बैठकीमध्ये माजी सैनिक आणि शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन एमआयडीसी रद्दचा निर्णय शासनाने घ्यावा ही अपेक्षा व्यक्त केली.
यावर उद्योगमंत्र्यांनी मी बोललो म्हणजे मीटिंग लावली असं समजा आणि जे टाकळीतील सैनिकांना अपेक्षित आहे तेच करणार एक इंच ही जमीन घेणार नाही असं तोंडी आश्वासन दिलं पण लेखी पत्र अध्यापि दिलेले नाही त्यामुळे जोपर्यंत बैठकीचा ठोस पत्र मिळत आणि एमआयडीसी रद्दचा निर्णय होत नाही तो पर्यंत आंदोलनाचा पावित्रा कायम ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी बैठकीला गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी मंगेश चिवटे शिंदे सेनेचे विशाल पाटील बजरंग पाटील कॅप्टन प्रकाश खोत राजेश कदम शामराव पाटील विजय गायकवाड अमर पाटील विनोद पाटील सतीश सावंत प्रदीप पाटील नितीन पाटील दिलीप पाटील सुरेश निकम अशोक पाटील रामचंद्र पाटील नवनाथ पाटील सुरेश गोते आत्माराम पाटील कृष्णा पाटील इत्यादी माजी सैनिक व शेतकरी उपस्थित होते

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!