*टेंबलाई देवीला मेढे तालमीचे पंचगंगेचे पवित्र पाणी अर्पण*
कोल्हापूर: प्रतिनिधी
कोल्हापूरात परंपरा, श्रद्धा आणि जलकृतज्ञतेचा अनोखा सोहळा.
श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी आषाढ महिन्यात टेंबलाई देवीची जत्रा साजरी करण्याची परंपरा शेकडो वर्ष्यांची परंपरा आजही तितक्याच भक्तीभावाने जपली जात आहे.
या परंपरेमागे देवी भक्ती बरोबरच पावसाळ्यात मिळालेल्या जलसंपत्ती बद्दल कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची भावनाही दडलेलेली आहे. यानिमित्ताने पंचगंगा पवित्र पाणी धार्मिक विधी करून घागरी मध्ये भरले जाते. यानंतर हे पाणी पारंपरीक वाद्यायांच्या गजरात आणि टेंबलाई देवीच्या जयघोषाने मिरवणूकीने टेंबलाईदेवीच्या मंदिरात नेऊन अर्पण केले जाते.
याच पद्धतीने आज कोल्हापूरातील सोमवार पेठेतील 125 वर्षाची परंपरा असलेली कै नारायण मेढे तालीम मंडळाने टेंबलाईदेवी ला मिरवणूकीने पाणी अर्पण सोहळा पार पडला.
मिरवणूक सुरु होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणूकीला सुरुवात केली.
यावेळी तालमीचे अध्यक्ष बाळकृष्ण मेढे, नगरसेवक आदिल फरास, माजी उपमहापौर जोत्स्ना मेढे, माजी नगरसेवक रमेश पोवार, प्रकाश गवंडी, संभाजी इंगवले,सामाजिक कार्यकर्ते राजु मुळीक, सुशांत पोवार, अनिल मेढे, संग्राम मेढे,युनुस नदाफ,अशपाक आजरेकर, पप्पू शेख, सचिन गोंदकर, किशोर मेढे, राम गराडे,निलेश गवळी, सौरभ येलेकर, सौरभ येलेकर वैभव हावळ, आदी कार्यकर्ते व महिला अबालरुद्ध उपस्थित होते.




