कागल : पी आर पाटील म्हणजे जिव्हाळा जपणारा माणूस : शिक्षक नेते भरत रसाळे
कोल्हापूर :कागल येथील तु .बा. नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी . आर . पाटील यांनी संपूर्ण सेवा काळात विद्यार्थी व शिक्षण हिताला प्राध्यान्य देऊन आपली सेवा बजावली . विद्यार्थी व संपूर्ण शिक्षण क्षेत्रांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारा माणूस म्हणून ते सदैव आठवणीत राहतील असे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे यांनी केले .ते सरस्वती मंगल कार्यालयात आयोजित मुख्याध्यापक पी आर .पाटील यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव वैशाली नाईक या होत्या . तर मान्यवर म्हणून पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मण पाटील ,संघटनेचे विभागीय अध्यक्ष महादेव डावरे , पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रवीण पाटील हे उपस्थित होते .
यावेळी बोलताना भरत रसाळे म्हणाले की, पी .आर. पाटील यांनी आपल्या 29 वर्षांच्या सेवेत आदर्श शिक्षका बरोबरच आमच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष ,इचलकरंजी येथील खाजगी शिक्षक पतसंस्था व कुर्ली येथील बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन म्हणून चांगले कार्य केले आहे . त्यांची ही कामगिरी शिक्षण व सहकार क्षेत्राला अभिमानास्पद असून समाजाला दिशादर्शक आहे . यावेळी माजी सरपंच कुमार माळी , लालासो झेंडे, यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खाजगी शिक्षक समितीचे राज्यसंघटक पी . डी .आवळे यांनी केले .आभार अनिल पाटील यानी मानले सूत्रसंचालन प्रदीप कतगर यांनी केले . राजेश रघुनाथदादा कदम, उतमदादा रावसाब पाटील व पंकजा पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते , शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
………
मा . संपादक सो
वरील वृत्त आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करण्याविषयी विनंती आहे
आ .वि
भरत रसाळे (राज्याध्यक्ष )महाराष्ट्र राज्य खासगी बातमी शिक्षक सेवक



