नाँर्थ अमेरिकन असोशिएशन्स’ च्या *”नाफा”फिल्म फेस्टिव्हल मध्ये पुण्याचा डंका

Spread the news

*’नाँर्थ अमेरिकन असोशिएशन्स’ च्या *”नाफा”फिल्म फेस्टिव्हल मध्ये पुण्याचा डंका*
नुकताच *’नाँर्थ अमेरिकन असोशिएशन्स’ चा *”नाफा”फिल्म फेस्टिव्हल अमेरिकेत दिनांक ८आँगस्ट २०२६ -रोजी पार पडला. देऊळ चित्रपटाचे निर्माते श्री. अभिजित घोलप यांच्या पुढाकाराने हा फेस्टिव्हल सुरु झालेला असून यंदाचे हे तिसरे वर्ष होते.
यावर्षी शाँर्ट फिल्म कँटेगरी मध्ये अथर्व खारकर फिल्म्स् च्या प्रफुल्ल खारकर दिग्दर्शित *”बटरस्काँच”* या फिल्म ला बेस्ट शाँर्ट फिल्म (अमेरिका) , बेस्ट डायरेक्टर, बेस्ट सिनेमँटोग्राफर आणि बेस्ट एडिटर असे पुरस्कार मिळाले आहेत.
ही फिल्म पुणे येथील तरुण संकलक *अथश्री ठुबे* यांनी संकलीत केली असून त्यांना या फेस्टिव्हल मध्ये *बेस्ट एडिटर* चा पुरस्कार सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक श्री। नागराज मंजुळे यांचे हस्ते प्राप्त झाला आहे.
संकलक अथश्री ठुबे हे या क्षेत्रात गेली १० ते १२ वर्षे काम करीत आहेत. या काळात त्यांच्या नावावर ‘आँल इज वेल’ ही मराठी फिल्म आहे. तसेच नेटफ्लिक्स च्या ओरिजनल ‘ब्लू कोबाल्ट’ या चित्रपटासाठी त्यांनी आँनलाईन एडिटर म्हणून काम पाहिले आहे.
अथश्री यांनी अनेक डाँक्युमेंटरी व काँर्पोरेट फिल्म एडिट केलेल्या असून त्यातील ‘अभिमानास्पद महाराष्ट्र, मीट द वर्ल्ड विथ एसकेएफ’ या उल्लेखनीय डाँक्युमेंटरी आहेत.
आयसीआयसीआय बँक, लाईफ रिपब्लिक, इंदिरा युनिव्हर्सिटी, चितळे डेअरी या व अशा नँशनल व इंटरनँशनल विषयांवरील जाहिराती अथश्री यांनी एडिट केलेल्या आहेत.
अथश्री यांनी व्हिज्युअल प्रमोशन मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले असून त्यातील ‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन चांगलेच गाजले आहे.
‘सुतक’ तसेच ‘लास्ट विश’ या त्यांनी एडिट केलेल्या शाँर्ट फिल्म्स ने अनेक फेस्टिव्हल मध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कलाक्षेत्रात अथश्री हे जेन झी चे प्रतिनिधित्व करीत असून त्यांना मिळालेल्या ह्या पुरस्काराने त्यांना पुढील कामासाठी दिशा व हुरूप मिळाला असून मराठी चित्र क्षेत्रात मोठे काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!