🚩 *जिल्हा परिषद कोल्हापूरच्या गणेशोत्सव बंदीच्या निर्णयाचा जाहीर निषेध!* 🚩
*२२ वर्षांपासून जिल्हा परिषदेत सुरू असलेला गणेशोत्सव यंदा रद्द करण्याचा निर्णय का?*
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला *‘राज्य उत्सव’* म्हणून मान्यता दिलेली असताना, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये *गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याची बाब अत्यंत गंभीर आहे.*
विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद परिसरात गणेश प्रतिष्ठापना होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अचानक गणेशोत्सव बंद करण्याचा निर्णय घेण्यामागचे नेमके कारण प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे.
*या निर्णयाचा हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर जाहीर निषेध करीत आहे.*
😡😡😡😡😡😡
👉 प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
👉 गणेशोत्सवाबाबत स्पष्ट आणि पारदर्शक भूमिका जनतेसमोर मांडावी.
👉 शासनाच्या ‘राज्य उत्सव’ या भूमिकेशी सुसंगत निर्णय घ्यावा.
*हिंदुत्ववादी संघटना, गणेशभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी या विषयावर कायदेशीर व लोकशाही मार्गाने आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर करीत आहे.*
🚩🚩🚩🚩🚩🚩
“गणपती बाप्पा मोरया!”*
— दिपक देसाई
जिल्हाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर
८६६८६२३५८१



