कागलमध्ये ३१ ऑगस्टपासून श्रीमद् भागवत सप्ताह श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीचा उपक्रम

Spread the news

*कागलमध्ये ३१ ऑगस्टपासून श्रीमद् भागवत सप्ताह*

­

 

*श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीचा उपक्रम*

  •  

कागल, ता. २६ : येथील श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीच्या वतीने श्रीराम मंदिर येथे सोमवार (ता. ३१) ते रविवार (ता.६ सप्टेंबर) या कालावधीत भव्य ‘श्रीमद् भागवत सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मासानिमित्त सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात भागवत महापुराणातील विविध प्रसंगांचे निरूपण, कीर्तन-प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
‘हरिकथेमध्ये रममाण राहून हरिचरणांच्या आश्रयाने जीवन सुखसंपन्न, आनंदी व सुरक्षित ठेवावे,’ या संदेशातून भक्तांनी या भागवत सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सप्ताहाचे निरूपण कथाकार सौ. कांचनताई धनाले करणार आहेत.
सप्ताहाची सुरुवात सोमवार (ता. ३१ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार असून, यावेळी श्रीमद् भागवत महात्म्य कथारंभ, मुनीजिज्ञासा व नारदव्यास संवाद यांचे निरूपण होईल. मंगळवार (ता. १ सप्टेंबर) रोजी श्रीशुक चरित्र, राजा परीक्षित चरित्र, मनुकर्दम चरित्र व कपिल व्याख्यान होणार आहे.
बुधवार (ता. २) रोजी सतीचरित्र, ध्रुव आख्यान, भरत चरित्र, अजामिळ आख्यान, नरसिंह अवतार व प्रल्हाद चरित्र, तर गुरुवार (ता. ३) रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, श्रीराम चरित्र व श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
शुक्रवार (ता. ४) रोजी नंद उत्सव, श्रीकृष्ण बाललीला, कुमारलीला व गोवर्धन पूजा होणार असून, शनिवार (ता. ५) रोजी रासक्रीडा, कंसवध व श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह या प्रसंगांचे निरूपण केले जाणार आहे.
सप्ताहाची सांगता रविवार (ता. ६ सप्टेंबर) रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत होईल. यावेळी द्वारिका लीला, सुदाम चरित्र, उद्धव उपदेश, मार्कंडेय कथा तसेच श्रीमद् भागवत कथा समाप्ती होणार आहे.या दिवशी महाप्रसाद वाटप होणार आहे. त्यासाठी भाविकांनी यथाशक्ती मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!