ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत

Spread the news

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत

­

 

कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे यांची केंद्रशाळा विद्या मंदिर पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत कु. सर्वेश मोरे, कु. मेघना जाधव, कु. प्रिती चौगुले आणि श्री. विक्रम रेपे यांनी सहभाग घेतला. शाळेच्या ‘लोकराजा सभागृहात’ कार्यक्रम संपन्न झाला. या मुलाखतीत विद्यार्थ्यांनी साहित्य, शिक्षण, समाजजीवन आणि जीवनमूल्ये यांसंदर्भात डॉ. लवटे यांना विविध प्रश्न विचारले.
डॉ. लवटे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अत्यंत मनमोकळेपणाने उत्तरे देत आपल्या जीवनातील अनुभव आणि विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. वाचनाची आवड जोपासणे, सतत शिकत राहणे आणि समाजाकडे संवेदनशीलतेने पाहणे, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

  •  

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या मुलाखतीमुळे त्यांना एका अनुभवी साहित्यिकाच्या विचारांचा आणि जीवनप्रवासाचा जवळून परिचय झाला. संवादातून विद्यार्थ्यांना प्रेरणा व नवी दृष्टी मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास पाडळी बुद्रुकचे
सरपंच शिवाजी गायकवाड,
उपसरपंच तेजस्विनी पाटील,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कपिल मेडशिगे, दत्तात्रय पाटील,
उपाध्यक्ष निलेश पाटील, मीना जाधव, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. जी. पी. माळी, डॉ. इस्माईल पठाण, शिक्षण सहसंचालक डॉ. जी. बी. कमळकर,गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, जॉर्ज क्रूझ, प्रा. सी.एम गायकवाड, प्रा. टी. के. सरगर, डॉ. जे के पवार, चंद्रकांत निकाडे यांच्यासह डॉ.सुनीलकुमार लवटे विचारमंचचे सदस्य , क्रिएटिव्ह टीचर फोरमचे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रशाळा विद्या मंदिर पाडळी बुद्रुकचे मुख्याध्यापक दीपक जगदाळे व शाळेतील शिक्षक सुनील पोवार , तिरुपती मुसळे, एम्. वाय. कांबळे, सतीश अश्वरत्न, अरुण पाटील यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि विचार करण्याची प्रेरणा निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!