कागल तालुक्यातील सहा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांना मोठे यश*

Spread the news

*कागल तालुक्यातील सहा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर*

­

 

*वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांना मोठे यश*

  •  

कोल्हापूर, दि. २८:
कागल तालुक्यातील धार्मिक पर्यटन आणि भाविकांच्या सोयी-सुविधांना गती देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील सहा प्रमुख ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात तब्बल १० कोटी ४ लाख ४४ हजार रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या भरीव निधीमुळे कागल तालुक्यातील धार्मिक स्थळांचा चेहरामोहरा बदलणार असून भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

कागल तालुक्यातील भाविकांची वाढती गर्दी आणि यात्रा-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पालखी मार्ग, वाहनतळ, वीज आणि परिसराचे सुशोभीकरण व्हावे, यासाठी ना. हसन मुश्रीफ यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून शासनाने विविध तीर्थक्षेत्रांतील विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे. या भरीव निधीबद्दल तालुक्यातील ग्रामस्थ, देवस्थान समित्या आणि भाविकांकडून नामदार हसन मुश्रीफ यांचे आभार मानले जात आहेत.

तीर्थक्षेत्रनिहाय मंजूर निधी व प्रस्तावित कामे खालीलप्रमाणे:

१. श्री बाळूमामा सत्यवादेवी मंदिर, मेतके (निधी: २ कोटी रुपये):
• ​देवालयाकडे जाणारा रस्ता व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि इतर सोयी-सुविधा (रु. ५० लक्ष)
• ​पालखी मार्गास बंदिस्त गटर्स करणे (रु. ४० लक्ष)
• ​देवालय ते करड्याळ रस्ता व गटर्स करणे (रु. ६० लक्ष)
• ​देवालयाकडे जाणारा रस्ता व पेव्हिंग ब्लॉक (रु. ५० लक्ष)

२. श्री हनुमान मंदिर, भडगाव (निधी: २ कोटी १० लाख रुपये):
• ​वाहनतळ (पार्किंग) विकसित करणे (रु. ९० लक्ष)
• ​पोहोच रस्ता करणे (रु. ५० लक्ष)
• ​पालखी मार्ग तयार करणे (रु. ५० लक्ष)
• ​सभामंडप बांधणे (रु. २० लक्ष)

३. हजरत लाडले मशाकात दर्गाह, कसबा सांगाव (निधी: २ कोटी १ लाख ४० हजार रुपये):
• ​परिसर सुधारणा करणे (रु. ८९.४५ लक्ष)
• ​दर्ग्याकडे जाणारा रस्ता करणे (रु. ८० लक्ष)
• ​पेव्हिंग ब्लॉक बसविणे (रु. १७ लक्ष)
• ​सौरदिवे (सोलर लाईट्स) लावणे (रु. १४.९५ लक्ष)

४. श्री अंबाबाई मंदिर, यमगे (निधी: २ कोटी १ लाख ३४ हजार रुपये):
• ​अप्रोच रस्ता करणे (रु. ८० लक्ष)
• ​मंदिर परिसर सुशोभीकरण करणे (रु. ५०.४८ लक्ष)
• ​पालखी मार्ग तयार करणे (रु. ४९ लक्ष)
• ​परिसरात पथदिवे बसविणे (रु. २१.८५ लक्ष)

५. श्री सिद्धेश्वर देवालय, सिद्धनेली (निधी: १ कोटी १७ लाख ४० हजार रुपये):
• ​पालखी मार्गाचे रुंदीकरण करणे (रु. ४८.९० लक्ष)
• ​मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे (रु. ४२.६० लक्ष)
• ​संरक्षक भिंत व गटर्सचे बांधकाम करणे (रु. २५.९० लक्ष)

६. श्री गहिनीनाथ देवालय, पिराचीवाडी (निधी: ७४ लाख ३० हजार रुपये):
• ​पालखी मार्गाचे रुंदीकरण करणे (रु. ४८.६० लक्ष)
• ​भाविकांसाठी भव्य प्रसादालय बांधणे (रु. २५.७० लक्ष)

□ भाविकांसाठी सर्वसमावेशक सोयी-सुविधा: श्री. मुश्रीफ
​ मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या कामांमुळे केवळ मंदिरांचा परिसर सुशोभित होणार नसून येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडी, रस्त्यांची अडचण आणि रात्रीच्या प्रकाशाची सोय मार्गी लागणार आहे. तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणे हाच आपला उद्देश आहे.
===========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!