नेहमीप्रमाणे व्हाईट आर्मी, कोल्हापूर पुन्हा एकदा नेपाळच्या मदतीसाठी सरसावली आहे. या आपत्कालीन परिस्थितीत व्हाईट आर्मी अंतर्गत ‘मिशन नेपाळ २०२६’ चे नेतृत्व श्री. उज्वल नागेशकर करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शशिकांत सातपुते, डॉ. शुभम पाटील, डॉ. कोमल इंदुलकर, डॉ. राहुल चौगुले, सुधीर गोरे, नितेश वनकोरे, विनायक भाट, निखिल लंबू, शालमोन आवले, अमन धनवडे, शंकर कांबळे अशी मेडिकल व रिलीफ टीम मदतीसाठी रवाना होत आहे.
तसेच यावेळी एस्टर आधार हॉस्पिटल ने पाच हजार लोकांना लाभ होईल एवढे औषध साहित्य मिशन नेपाळ करिता दिले आहे.
आज दि. २८ ऑगस्ट २०२६, शुक्रवार रोजी रात्री व्हाईट आर्मीची टीम कोल्हापुरातून रवाना झाली. यावेळी व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे, डॉ. अमोल कोडोलीकर उपस्थित होते.



