१५ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत शुभंकर भाट्ये याचा खारीचा वाटा

Spread the news

बंगलोरू येथे सुरू असलेल्या १५ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत लीग मधील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूर (संजीवन,पन्हाळा) संघाने गोवा संघाचा १–० गोलने पराभव करत गटात आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार शुभंकर भाट्ये याने विजयी गोल करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. या गटात महाराष्ट्र,गोवा, आसाम आणि श्रीलंका यांचा सहभाग असून एकूण ३४ संघानी आपापल्या राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व करत सहभाग नोंदवला आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!