मंजूर निधी परत करणाऱ्या शिंगणापूर ग्रामपंचायत विरोधात आक्रमक भूमिका

Spread the news

मंजूर निधी परत करणाऱ्या शिंगणापूर ग्रामपंचायत विरोधात आक्रमक भूमिका

­

 

करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीसाठी मंजूर झालेला 25 लाखांचा निधी परत पाठवण्याचा केलेल्या ठरावा विरोधात आज भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने करवीर गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निधीला विरोध करणाऱ्या उपसरपंच, सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  •  

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून गावातील मागासवर्गीय वस्त्यांतील कॉंक्रीट रस्ते करण्यासाठी 25 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचे प्रशासकीय मान्यताचे आदेश देखील झाले आहेत.

मात्र शिंगणापूर ग्रामपंचायत मधील उपसरपंच आणि 12 सदस्यांनी सदर निधीला विरोधी ठराव करत. निविदा प्रक्रियेला विरोध केला आहे. या प्रकाराविरोधात आज भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष पांडुरंग वायदंडे यांनी करवीर गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निधी नाकारणाऱ्या ठराव आणि सदस्यांची चौकशी करावी, उपसरपंच व सदस्यांवर कारवाई करावी, मंजूर निधीचे काम तात्काळ सुरू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

कोट

पांडुरंग वायदंडे, जिल्हाध्यक्ष, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा (ग्रामीण पश्चिम)

तर निधीला विरोध करणाऱ्या त्या पाच मागासवर्गीय सदस्यांच्या चुकीच्या प्रवृत्तीचा निषेध करत लेखी खुलाशाची मागणी केली आहे.

 

कोट

– बाळासो कांबळे, माजी जि.प. सदस्य

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग वायदंडे, प्रदेश सचिव दीपक शिरगावकर, विजय गायकवाड, ओंकार आवळे, आदी उपस्थित होते. शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या या प्रकाराचा मागासवर्गीय जनतेतून विरोध वाढू लागला आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!