*चिमगावच्या डॉ.मोनिका एकल यांच्याशी राजे समरजितसिंह घाटगे यांचा संवाद* *औषधनिर्मितीतील अंतराळ संशोधनाचे केले कौतुक

Spread the news

*चिमगावच्या डॉ.मोनिका एकल यांच्याशी राजे समरजितसिंह घाटगे यांचा संवाद*
*औषधनिर्मितीतील अंतराळ संशोधनाचे केले कौतुक*
कागल, ता. १ : अंतराळ संशोधन, रोबोटिक्स आणि भविष्यातील औषधनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या कागल तालुक्यातील चिमगावची सुकन्या डॉ. मोनिका एकल यांच्याशी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी ऑनलाइन संवाद साधला. त्यांच्या संशोधनाची माहिती जाणून घेत संशोधन कार्याचे त्यांनी कौतुक केले . अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा औषधनिर्मितीसाठी उपयोग, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील संशोधनाच्या शक्यता याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

­

 

डॉ. मोनिका एकल यांच्या नेतृत्वाखालील टीमकडून अंतराळातील मायक्रोग्रॅव्हिटीचा वापर करून औषधांचे अधिक शुद्ध व एकसमान क्रिस्टल तयार करण्याच्या तंत्रज्ञानावर संशोधन केले जात आहे. या संशोधनामुळे कर्करोगावरील औषधांसह विविध प्रगत उपचारांच्या निर्मितीला भविष्यात नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.या उल्लेखनीय संशोधनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेतली असून, त्यांनी डॉ. मोनिका एकल आणि त्यांच्या टीमची भेट घेऊन गौरव केला आहे. भारतीय तरुण वैज्ञानिकांच्या संशोधनक्षमतेला मिळालेली ही राष्ट्रीय पातळीवरील दाद महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या गौरवाबद्दल राजे समरजितसिंह घाटगे यांनी डॉ. मोनिका एकल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले.

  •  

अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ अंतराळ संशोधनापुरता मर्यादित न राहता औषधनिर्मिती, आरोग्य आणि रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असे डॉ. एकल यांनी यावेळी अधोरेखित केले. तरुण वैज्ञानिकांच्या नावीन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन आणि योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असल्याचे सांगत कोल्हापूरच्या कन्येने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात मिळविलेली ही झेप छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरसाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गगार घाटगे यांनी काढले.

छायाचित्र चिमगाव येथील सुकन्या डॉ.मोनिका एकल यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधताना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!