2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी : आम . सतेज पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या कडे मागणी
कोल्हापूर : दि . 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री नाम . देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .
याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेल केले असून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ व खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांना या निवेदनाची प्रत दिली आहे .
या निवेदनात आम सतेज पाटील यांनी म्हटले आहे की राज्यातील विनाअनुदानित , टप्पा अनुदानित व अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील 1 नोव्हे 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीचा दिनांक व सेवा काल विचारात घेऊन त्यांना जुनी पेन्शन देणे हे न्याय ठरणार आहे .जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे सदर शिक्षक कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिक प्राप्त होणार असून त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितता
लाभणार आहे .त्यामुळे शासनाने इतर सर्व आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना जशी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे तशीच जुनी पेन्शन योजना या शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत सहानुभूतीने निर्णय घ्यावा व या शिक्षक कर्मचार्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती ही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली .आहे



