*शिक्षकाच्या सेवानिवृतीचा सन्मान हा देशांसाठी केलेल्या सवेचा सन्मान : भरत रसाळे*

Spread the news

*शिक्षकाच्या सेवानिवृतीचा सन्मान हा देशांसाठी केलेल्या सवेचा सन्मान : भरत रसाळे*
कोल्हापूर : ‘ प्रियांका गवळी यांनी पस्तीस वर्षे व्रतस्थ भावनेने शिक्षकी पेशा पार पाडला . शिक्षकांने
केलेली सेवा ही देशसेवा असते . त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा सन्मान हा देशासाठी केलेल्या सेवेचा सन्मान असतो . ‘असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले .ते श्रीराम विद्यालय कोल्हापूर येथील अध्यापिका प्रियांका
गवळी यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह उदय बेनाडीकर हे होते . तर संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री बेनाडीकर या मान्यवर पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .
समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते प्रियांका गवळी यांचा संस्था व संघटने च्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून बोलताना उदय बेनाडीकर यांनी सांगितले की , संस्थाप्रमुख हा कधीकधी कठोर वाटतो पण त्या पाठीमागे त्यांची शैक्षणिक तळमळ असते . प्रियांका गवळी यांनी विज्ञान शिक्षिका म्हणून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे .
यावेळी समितीचे राज्य सचिव शिवाजी भोसले , चेअरमन रोहिणी येडगे यांनी मनोगत व्यक्त केले .प्रास्ताविक पतसंस्थेचे व्हा . चेअरमन शिवाजी सोनाळकर यांनी केले तर आभार सचिव अरुण गोते यांनी मानले .यावेळी समितीच्या जिल्हाध्यक्ष सविता गिरी ,व्यवस्थापक सदाशिव साळवी , शाळेचा अध्या वर्ग यांच्यासह शिक्षक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता .
……
मा संपादक सो
स .न . वि . वि .
वरील वृत्त आपले लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करणे विषयी विनती आहे .
आ वि .
भरत रसाळे

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!