“३७ वर्षांच्या विश्वासपूर्ण वाटचालीचा गौरव! वर्धापन दिन सोहळ्यात आमदार अमल महाडिक साहेब यांच्या उपस्थितीत संस्थेच्या प्रगतीचा गौरव करताना चेअरमन किरण पाटोळे, संस्थापक राजाराम पाटोळे व सर्व संचालक मंडळ सदस्य”

Spread the news

श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचा ३७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न!
​कोल्हापूर:
सहकाराचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरमध्ये, श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुख्य कार्यालय व शाखा पाटोळेवाडीचा ३७ वा वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

­

 

​या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जनरल मॅनेजर श्री. राहुल गणपतराव तरवडेकर यांनी केले.
​प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती व मार्गदर्शन
​कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे चेअरमन तथा आमदार श्री. अमल महाडिक (साहेब) उपस्थित होते. आपल्या मनोगतात बोलताना आमदार अमल महाडिक यांनी, “संस्था अशीच प्रगती करत भविष्यात ५०० कोटींचा टप्पा नक्कीच पूर्ण करेल,” असा विश्वास व्यक्त केला.
​
​ संस्थेचे संस्थापक श्री. राजाराम बापुसो पाटोळे यांनी संस्थेचा सर्व लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.
​ चेअरमन श्री. किरण बळवंत पाटोळे यांनी, “सभासद आणि संचालक मंडळाच्या अतुट विश्वासावरच संस्थेची यशस्वी घोडदौड अविरत सुरू आहे,” असे गौरवोद्गार काढले.
​विशेष आकर्षण
​या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ग्राहपयोगी मोबाईल ॲप आणि पतसंस्थेच्या वेबसाईटचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
​कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन असिस्टंट जनरल मॅनेजर नंदकिशोर तोरलेकर यांनी केले

  •  

संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सभासद, व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!