संघर्ष योद्धा श्री. खंडेराव जगदाळे सर यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल*

Spread the news

संघर्ष योद्धा श्री. खंडेराव जगदाळे सर यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल*

­

 

 

  •  

*पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विधानभवन, पुणे येथे उमेदवारी अर्ज दाखल*

*पुणे, दि. ५ ऑक्टोबर २०२६ :*

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिक्षक नेते तथा *संघर्ष योद्धा श्री. खंडेराव जगदाळे सर* यांनी आज विधानभवन, पुणे येथे समर्थक शिक्षकांच्या मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी *कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर* या पाचही जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विधानभवन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी *शिवाजी कुरणे, मच्छिंद्र जाधव, मेजर के. एम. भोसले, सुनील पानसरे, संजय डावरे, प्रेमकुमार बिंदगे, मनोहर पवार, संदीप काळे, मच्छिंद्र सावंत, डी. पी. कदम, अमोल पाटील, मुरलीधर कवाडकर, यादव शेळके, प्रमोद पाटील, गोरख कुळधर, भारत भामरे, हेमंत धनवडे, सतीश लोहार, अनिल देसाई* यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील शिक्षक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे *श्री. खंडेराव जगदाळे सर* यांनी विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, प्रलंबित अनुदान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा-सुरक्षा, जुनी पेन्शन योजना तसेच शिक्षकांच्या विविध हक्कांसाठी सातत्याने आंदोलने आणि संघर्ष उभारला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांनी एकजुटीचे दर्शन घडवत *“शिक्षकांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे नेतृत्व विधानपरिषदेत गेले पाहिजे”* असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना *श्री. खंडेराव जगदाळे सर* यांनी सांगितले की,
*“ही निवडणूक माझी वैयक्तिक निवडणूक नसून पुणे विभागातील प्रत्येक शिक्षकाच्या हक्काची आणि न्यायाची लढाई आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत बुलंद आवाज मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष यापुढेही अविरत सुरू राहील.”*

महाराष्ट्राच्या विविध भागांतून शिक्षकांनी दाखविलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने दिलेली उपस्थिती ही *श्री. खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वावरील शिक्षकांचा विश्वास आणि त्यांच्या संघर्षाला मिळालेली व्यापक साथ दर्शविणारी असल्याची भावना* यावेळी व्यक्त करण्यात आली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने झालेल्या या शक्तिप्रदर्शनातून *शिक्षक एकजुटीचा आणि संघर्षाच्या लढ्याचा बुलंद संदेश* देण्यात आला.

*“संघर्षाची मशाल पेटली आहे…*

*शिक्षकांच्या हक्कासाठी लढा आता विधानपरिषदेपर्यंत!”**

*“शिक्षकांच्या हक्कासाठी संघर्ष…*

*संघर्षातून विधानपरिषदेत प्रवेश!”**

खंडेराव जगदाळे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!