शेतकरी,ग्राहकांच्या विश्वासावर ‘शाहू दूध’ ब्रँड नावारुपास-राजे समरजितसिंह घाटगे

Spread the news

शेतकरी,ग्राहकांच्या विश्वासावर ‘शाहू दूध’ ब्रँड नावारुपास-राजे समरजितसिंह घाटगे

­

 

कागल, प्रतिनिधी : शेतकरी व ग्राहकांचा विश्वास, तसेच दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ‘शाहू दूध’ बाजारपेठेत विश्वासार्ह ब्रँड म्हणून नावारूपाला आला आहे. कोल्हापूरसह बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे आदी जिल्ह्यांत शाहूच्या दूध व उपपदार्थांना चांगली मागणी आहे,असे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे श्री छत्रपती शाहू मिल्क अँड ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या १८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे होते.
घाटगे पुढे म्हणाले,दूध व्यवसायाकडे दुय्यम व्यवसाय म्हणून पाहिले जात होते. मात्र, काळानुसार दूध व्यवसायाचे महत्त्व वाढले असून तो आता शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. दूध उत्पादकांना चांगला दूध दर मिळावा यासाठी शाहू दूध संघ कटिबद्ध आहे.
राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे म्हणाल्या, दूध व्यवसायात अनेक चढ-उतार येत असतानाही गुणवत्तेच्या जोरावर शाहू दूध संघानने बाजारपेठेतील आपले स्थान अधिक बळकट केले आहे. ‘शाहू’च्या दूधासह१९ हून अधिक उपपदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे.त्याचबरोबर दर्जेदार पशुखाद्य, तत्पर पशुसेवा व इतरही सेवा उपल्बध करून देत आहोत.आगामी काळात टप्प्याटप्प्याने दूध संकलनाची क्षमता २५ हजार लिटरपर्यंत वाढविण्याचे व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
यावेळी संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश सुळगावे यांचा घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला.
यावेळी शाहूचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. जनरल मॅनेजर दीपक पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. संचालक युवराज पसारे यांनी आभार मानले.
छायाचित्र ओळ : कागल येथे शाहू दूध संघाच्या १८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे. व्यासपीठावर राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील व संचालक.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!