शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ गावडे यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा

Spread the news

शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ गावडे यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा

­

 

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार शिक्षक मित्र श्री. कौस्तुभ गावडे यांचा वाढदिवस विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

  •  

कोल्हापूर, दि. 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले, माजी खा. संभाजीराजे, खा. धनंजय महाडिक, आ. राहुल आवाडे, गोकुळ माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच विविध संस्थांचे संस्थाचालक, विविध शिक्षक संघटना नेते, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी आजीव सेवक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गावडे यांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांबाबत सातत्याने संवाद साधणारे श्री. कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सहकारी आणि समर्थकांनी शहरात विविध ठिकाणी होर्डिंग लावून शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच वाढदिवसानिमित्त टाऊन हॉल बागेजवळ अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात दिवसभर गावडे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. ‘कोजिमाशि’चे शिक्षक नेते दादासाहेब लाड, बाळ डेळेकर, हातकणंगलेच्या सभापती मिनल मगदूम, माणगावचे सरपंच राजू मगदूम, गडहिंग्लजचे डॉ. सतीश घाळी, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, भाजपचे डॉ. अजय चौगुले, विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक स्वागत परुळेकर, उद्योजिका संजिवनी तोडकर, अब्राहम आवळे, अजित साळुंखे, अविनाश पाटील, डॉ. महादेव नरके, राहुल गोरे, पार्श्वनाथ बँकेचे शंकर पाटील, प्राचार्य अजय दळवी, प्रा. मधुकर पाटील, यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. कौस्तुभ गावडे यांनी शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!