NSS स्वयंसेवकांनी संकलित केला सुमारे १५० कि.ग्रॅम. नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा

Spread the news

NSS स्वयंसेवकांनी संकलित केला सुमारे १५० कि.ग्रॅम. नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत AISSMS Institute of Information Technology
(IOIT) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटतर्फे ओंकारेश्वर मंदिराजवळील मुठा
नदीकाठ व गणपती विसर्जन परिसरात दि. 21/09/2026 रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गणपती विसर्जनानंतर परिसरात जमा झालेला कचरा हटवून नदीकाठ स्वच्छ करण्यासाठी NSS
स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.
या मोहिमेदरम्यान प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या व कप, थर्माकोल, प्लास्टिक
सजावटीचे साहित्य, पॅकेजिंग साहित्य तसेच इतर नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा संकलित करण्यात
आला. स्वयंसेवकांनी परिसरातील विखुरलेला कचरा एकत्र करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट
लावण्यासाठी संकलन केले.

­

 

या स्वच्छता मोहिमेत एकूण १० कचऱ्याच्या पिशव्या, प्रत्येकी अंदाजे १५ कि.ग्रॅम, असा सुमारे
१५० कि.ग्रॅम नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा संकलित करण्यात आला. नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासोबतच
नागरिकांमध्ये नदी प्रदूषण रोखणे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे याबाबत जनजागृती
करण्यात आली.
या उपक्रमासाठी श्री मालोजीराजे छत्रपती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने तसेच
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली NSS
स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी या उपक्रमात सक्रिय सहभाग
घेतला.
“स्वच्छता ही सेवा, स्वच्छ परिसर हीच जबाबदारी” या संदेशातून नागरिकांनीही नदी व
सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!