माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
झिम्मा फुगडी स्पर्धेत अक्कमहादेवी मंडळ तर गणेश सजावट स्पर्धेत जयसिंग यादव प्रथम
कोल्हापूर
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित घरगुती गणेश देखावा स्पर्धा तसेच महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत कुंभोज येथील अक्कमहादेवी महिला मंडळाने प्रथम क्रमांक तर कसबा सांगाव येथील संत सावता महिला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने दरवर्षी घरगुती गणेशोत्सव स्पर्धा तर महिला मंडळाच्या वतीने झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या दोन्ही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत नागाव येथील जयदीप यादव प्रथम कसबा बावडा येथील सम्राट दिलीप माळी द्वितीय पाचगाव येथील अमोल कुमार म्हेत्रे तृतीय क्रमांक मिळवला.
झिम्मा फुगडी स्पर्धेत कुंभोज येथील अक्कमहादेवी महिला मंडळाने प्रथम कसबा सांगाव येथील संत सावता महिला मंडळाने द्वितीय तर बालिंगा येथील हिरकणी महिला मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ हुपरी येथील हिरकणी महिला मंडळाला मिळाला.
या स्पर्धेतील विजेत्यांचा माजी महापौर, नगरसेविका स्वाती येवलुजे, काँग्रेसच्या महिला सरचिटणीस भारती पोवार आणि नगरसेविका दिपाली घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान याचवेळी लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ ही पार पडला.
प्रारंभी महिला मंडळाचे अध्यक्ष वंदना माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष विद्या माळी यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष वैशाली माळी यांनी आभार मानले. यावेळी आदर्श सासू सून पुरस्कार सौ. नर्मदा नारायण पाटील, सौ. सुप्रिया बालाजी पाटील, सौ. स्मिता रमेश पाटील यांना तर आदर्श पती-पत्नी पुरस्कार रूपाली माळी, विजय माळी यांना देण्यात आला. या कार्यक्रमास नेहा अभिजीत माळी, लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, संचालक राजाराम माळी, माजी अध्यक्ष अशोक माळी, महिला संघटनेच्या सचिव श्रुती कुलगुडे, मार्गदर्शक मीनाक्षीताई माळी, साधना माळी, शीला गोंधळी, निर्मला माळी, रूपाली सचिन माळी, इंद्रायणी चौगुले, भाग्यश्री माळी, वनिता माळी, नम्रता सुतार, ऋतुजा अजय माळी यांच्यासह संचालिका आणि समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन संतोष माळी यांनी केले.



