कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित सहा तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त जाहीर करा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजे समरजितसिंह घाटगे यांची मागणी

Spread the news

कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित सहा तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त जाहीर करा

­

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजे समरजितसिंह घाटगे यांची मागणी

  •  

कागल, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट न झालेल्या कागल, गडहिंग्लजसह उर्वरित सहा तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा,अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.
मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन घाटगे यांनी याबाबतचे सविस्तर निवेदन सादर केले.
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी घाटगे यांची भेट घेऊन पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती दिली होती. व याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणेबाबत विनंती केली होती. त्यानंतर घाटगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिली असून, पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या ऊस पिकाची वाढ खुंटली असून, त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे.तसेच खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी यांसह अन्य पिकांनाही पावसाअभावी मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे; मात्र उर्वरित कागल, गडहिंग्लज, करवीर, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांचा समावेश नाही.या सहा तालुक्यांमध्येही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कागल तालुक्यातील कापशी विभागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणाऱ्या सवलती व मदत मिळावी, अशी मागणी घाटगे यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती घाटगे यांनी दिली.

छायाचित्र ओळ : मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गडहिंग्लजसह उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!