महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, कोल्हापूर 🚩 शारदीय नवरात्र महोत्सव अन्नदान उपक्रम संपन्न!

Spread the news

महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, कोल्हापूर 🚩
शारदीय नवरात्र महोत्सव अन्नदान उपक्रम संपन्न!
करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित अन्नदान उपक्रमात ७५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 🙏✨
🍁 मसाले भात, भाजी, आमटी, खीर आणि ताक अशा विविध रुचकर व सात्विक महाप्रसादाचा आस्वाद देश-विदेशातून आलेल्या अंबाबाईच्या भक्तांनी घेतला.
👑 हा भव्य उपक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
🤝 विशेष सहकार्य:
या उपक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने शेजारील हॉल उपलब्ध करून देऊन विशेष सहकार्य केले. तसेच ७५ कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिली.
🙌 स्वयंसेवकांचे योगदान:
नियोजनासाठी संजय जोशी, राजेश सुगंधी, एस. के. कुलकर्णी, सुनील जोशी, ॲडव्होकेट तन्मय मेवेकरी, आदित्य मेवेकरी, ऋतुराज सरनोबत, प्रतीक गुरव, रजत जोशी, प्रशांत तहसीलदार, सतीश सरनाईक, चंद्रशेखर घोरपडे विराज कुलकर्णी सुनील खडके अंकित भोसले प्रथमेश कुलकर्णी अनिल व्हटकर आदी सर्व स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!