Spread the news

*स्वर्गीय प्रा. शरद वराडकर स्मृती प्रतिष्ठान आणि ‘यंदा कर्तव्य विवाह’२०२६ आयोजित राज्यस्तरीय ‘रहस्य कथा’ स्पर्धेत पुण्याच्या अरुण कुलकर्णींची ‘काकीनाडाचा किनारा’ कथा अव्वल…*
हौशी आणि नवोदित मराठी लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ बनत चाललेल्या ‘यंदा कर्तव्य विवाह’ दिवाळी अंक आयोजित ‘रहस्य कथा’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्याबरोबर साता समुद्रा पलीकडून स्पर्धेसाठी मराठी लेखन करणाऱ्या लेखकांच्या उस्फूर्त प्रवेशिका आल्या होत्या. यातील लेखकांचे लेखन कौशल्यही वाखाणण्यासारखे होते. त्यामुळे स्पर्धेतील विजेते स्पर्धक निवडताना परीक्षकांना बरीच मेहनत घ्यावी लागली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांबरोबर उत्कृष्ट लेखनाचा प्रयत्न केलेल्या काही निवडक लेखकांच्या कथाही ‘यंदा कर्तव्य विवाह’च्या २०२६ च्या दिवाळी अंकामध्ये आम्ही प्रसिद्ध करत आहोत. यावर्षी रहस्य कथा स्पर्धा असल्यामुळे स्पर्धेसाठी परीक्षिकांकडून फक्त रहस्य कथा प्रवेशिकांचा विचार करण्यात आला. स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी सर्व स्पर्धकांचे कौतुक आणि सर्व यशस्वी आणि विजेत्या स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन…
रहस्य कथा स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक –
काकिनाडाचा किनारा : लेखक- अरुण कुलकर्णी, पुणे.
द्वितीय क्रमांक ( विभागून )
A- बांगड्यांचा खणखणाट ऐक ! : लेखक- शंतनु पु. चिंचाळकर, पुणे
B- न्याय  : लेखक- डॉ. राजेश जोशी, सातारा
तृतीय क्रमांक (विभागून)
A- पाऊलखुणा : लेखक- सेजल शिर्के, मुंबई
B- पाणी मुरतंय… : लेखक- सुप्रिया पुरुषोत्तम, मुंबई.
चतुर्थ क्रमांक
अकल्पित  : लेखक- डॉ. राजश्री शिरभाते, इंग्लंड
पाचवा क्रमांक
निशब्द पुरावा  : लेखक-  डॉ. अविनाश भोंडवे, पुणे
या स्पर्धेसाठी तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
उत्तेजनार्थ प्रथम
पिवळ्या दरवाजाची खोली : लेखक- मंदार धर्माधिकारी, मुंबई
उत्तेजनार्थ द्वितीय
सोनगडचे बंद रहस्य : लेखक- ज्योती भोये, मुंबई
उत्तेजनार्थ तृतीय
चकवा : लेखक- सौ स्वानंदी स्वरूप जोगळेकर, रत्नागिरी
खालील तीन उल्लेखनीय कथांचा समावेश यंदा कर्तव्य विवाह- 2026, दिवाळी अंकामध्ये करण्यात येणार आहे.
उल्लेखनीय कथा (3) :
1) मळ्यातील ते न उलगडलेले रहस्य : लेखक- शिरीषकुमार बने, मुंबई
2) वचनपूर्ती  : लेखक- मिलिंद सुधाकर लिमये, ठाणे.
3) गुणगुण  : लेखक- माधवी देवळाणकर, पुणे

­

 

स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांचे उस्फुर्त सहभागासाठी मनःपूर्वक अभिनंदन… स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून ऑनलाइन प्रशस्तीपत्र पाठवण्यात येईल.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!