वरिष्ठ व निवड श्रेणी सुट्टीतील प्रशिक्षण रद्द करून ऑनलाईन पद्धतीने घ्या
खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची शिक्षण आयुक्तांच्या कडे मागणी
कोल्हापूर दि. २९ : ” दिवाळी सुट्टीतील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण रद्द करून सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घ्यावे ” अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने लेखी निवेदनाद्वारे राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी निवेदन स्वीकारले.
या वर्षी दशवार्षिक राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमामुळे मे महिन्यातील शिक्षकांची संपूर्ण सुट्टी,जनगणना प्रशिक्षण व जनगणनेचे प्रत्यक्ष कामकाज करण्यात व्यस्त गेली आहे.
तसेच 30 जून पासून राज्यात मतदार यादी पुनरिक्षण ( एस.आय.आर.) कामकाजामुळे प्रत्येक शनिवार व रविवार सुट्टीच्या काळात शिक्षक सदर कामात व्यस्त आहे.
तरी वरील गोष्टींचा विचार करता या दिवाळी सुट्टी मध्ये होणारे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन ऐवजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करावे.तसेच शक्य झाल्यास सुट्टीतील प्रशिक्षण रद्द करून सदरचे प्रशिक्षण इतर वेळेत किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आयोजित करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच शक्य झाल्यास सुट्टीतील प्रशिक्षण रद्द करून सदरचे प्रशिक्षण इतर वेळेत किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आयोजित करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे,जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र टिके, शहराध्यक्ष संतोष पाटील, करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.



