पैलवान ग्रंथालय उपक्रमाचा कोल्हापूरी शनिवारी प्रारंभ : लोगो अनावरण आणि तालीम संस्थांना पुस्तक स्टँड आणि संच भेट

Spread the news

पैलवान ग्रंथालय उपक्रमाचा कोल्हापूरी शनिवारी प्रारंभ : लोगो अनावरण आणि तालीम संस्थांना पुस्तक स्टँड आणि संच भेट
कोल्हापूर – ​आमच्या आई सौ. वंदना दत्तात्रय सपकाळ (माई) यांच्या एकसष्ठीनिमित्त आणि महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल देशी खेळ असलेल्या ऐतिहासिक कुस्ती परंपरा अन् आधुनिक ज्ञानाचा संगम असलेल्या “पैलवान ग्रंथालय” (TM) या उपक्रमाचा ऐतिहासिक एकसष्ठी विशेष सोहळा शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी शाहू स्मारक भवन येथे दुपारी एक वाजता संपन्न होत आहे. या उपक्रमाच्या या पैलवान ग्रंथालय उपक्रमाच्या लोगो अनावरण आणि पाच तालीम संस्थांना पुस्तकाचे लोखंडी भक्कम स्टॅन्ड आणि वीज पुस्तकाचा संच भेट देऊन या उपक्रम ची सुरुवात होणार आहे . पालकमंत्री प्रकाश आंबिटकर खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने ,प्रकाश शेठ सावंत दत्ता आबा चव्हाणसह मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे कुस्ती क्रीडा क्षेत्रातील या नव्या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास सर्व क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे असे आव्हान मुख्य समन्वयक गिरीश वंदना दत्तात्रय सकपाळ यांच्या सह शरद आबा जगदाळे, शाहुपूरी तालमीचे वस्ताद आसिफ असून नदाफ यांनी केले आहे .
​भारतीय कुस्तीक्षेत्रात क्षात्रतेज व ज्ञानतेज यांचा संगम असलेला आणि माईंच्या एकसष्टीच्या शुभप्रसंगी साकार होत असलेला हा “कुस्ती -संस्कार – शिक्षण -संस्कृती” या मूल्यांवर आधारित समाजाभिमुख उपक्रम आहे. कोल्हापूर ही संपूर्ण देशाची कुस्ती पंढरी असल्यामुळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पावन भूमीत माईंच्या एकसष्ठीनिमित्त या वैचारिक क्रांतीचा श्रीगणेश होत आहे हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे .
​आमागी काळात ज्या तालमींना आपल्या तालमीत “पैलवान ग्रंथालय” हा उपक्रम सुरू करायचा असेल, त्यांनी ७०६६०७८९१० या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्या तालमीचे नाव, पैलवानांची संख्या, पत्ता आणि वस्तादांची माहिती पाठवावी.
असे आहवान
सपकाळ परिवार, निरा-मांजरी खुर्द
(पैलवान ग्रंथालय) मोबाई ल
संपर्क: ७०६६०७८९१० यांनी केले आहे .
तालीम ग्रंथालय उपक्रमात दिल्या जाणाऱ्या पुस्तकांची यादी
​1️⃣ भारताचे संविधान • भारत सरकार (विधि आणि न्याय मंत्रालय)
2️⃣ International Wrestling Rules • United World Wrestling (UWW)
3️⃣ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (कादंबरी खंड १) • महाराष्ट्र शासन
4️⃣ मराठी कुमार विश्वकोश (भाग १: अंकुरण ते ग्लुकोज) • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
5️⃣ मराठी कुमार विश्वकोश (भाग २: घटसर्प ते पॅरामिशियम) • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
6️⃣ मराठी कुमार विश्वकोश (भाग ३: पांगारा ते लाजाळू) • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
7️⃣ मराठी कुमार विश्वकोश (भाग ४: लिंबू ते ज्ञानेंद्रिये) • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
8️⃣ महात्मा फुले गौरव ग्रंथ • संपादक: हरी नरके
9️⃣ गोष्ट पैशापाण्याची • लेखक: प्रफुल्ल वानखेडे (सकाळ)
🔟 दहावी-बारावी नंतर करायचे काय? • संकलन: प्रा. अभिषेक बाळासाहेब आहेर (निराली प्रकाशन)
1️⃣1️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’तील सिद्धांत… • लेखक: डॉ. समाधान दामोधर बनसोडे (बार्टी, पुणे)
1️⃣2️⃣ अग्निवीर – भारतीय थलसेना (G.D.) • लेखक: रामसिंह यादव, याजवेन्द्र यादव
1️⃣3️⃣ राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश (भाग २) • पुराभिलेख संचालनालय, मुंबई
1️⃣4️⃣ छत्रपती शिवाजी महाराज • लेखक: प्र. न. देशपांडे
1️⃣5️⃣ आहारवाटा • लेखिका: अंजली प्रभुणे (आहारतज्ज्ञ)
1️⃣6️⃣ विजयाचे मानसशास्त्र • लेखक: भीष्मराज बाम (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
1️⃣7️⃣ लोकमाता अहिल्याबाई होळकर (चित्रमय चरित्र) • संपादक: डॉ. देवीदास पोटे
1️⃣8️⃣ ऑलिम्पिकवीर खाशाबा • लेखक: प्रा. संजय दुधाणे
​ समन्वयक -आयोजक: कृतज्ञता प्रतिष्ठान (संकल्पना: सौ. वंदना दत्तात्रय सपकाळ – माई)

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!