विजय टिपुगडे यांच्या ‘तरंगायन’ प्रदर्शनाला रसिकांच्या प्रतिसाद

Spread the news

विजय टिपुगडे यांच्या
‘तरंगायन’ प्रदर्शनाला रसिकांच्या प्रतिसाद

­

 

शेवटचे दोनच दिवस शिल्लक, पन्नासहुन अधिक कलाकृतींची विक्री

  •  

कोल्हापूर, दि. 22 ः येथील प्रसिध्द चित्रकार विजय टिपुगडे यांच्या निसर्गचित्रांच्या ‘तरंगायन’ प्रदर्शनाला
रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या आठ दिवसात 50 हून अधिक कलाकृतींची विक्री झाली असून मंगळवार (ता.2४) पर्यंत दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनातील मोठ्या कलादालनात प्रदर्शन सुरू राहणार आहे.

निसर्गचित्रणाच्या परंपरेला आपल्या वास्तववादी शैलीतून वेगळे रूप देणारे चित्रकार म्हणून श्री.टिपुगडे यांची ओळख आहे. ‘तरंगायन’ म्हणजे तीन दशकांपासून कलेला पूर्णपणे समर्पित असलेल्या एका सच्च्या कलावंताचा सृजनशील प्रवाह आहे. तब्बल १२ वर्षांनंतर त्यांचे वैयक्तिक निसर्गचित्र प्रदर्शन असून प्रदर्शनात जलरंग आणि ॲक्रेलिक या माध्यमांतील कलाकृती आहेत. कोल्हापूरच्या निसर्गरूपाचे, परिसरातील दृश्यवैभवाचे आणि निसर्गातील सूक्ष्म बारकाव्यांचे वास्तववादी शैलीतील चित्रण प्रदर्शनातून अनुभवायला मिळते आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!