भारतीय संविधानाचा विजय असो!

Spread the news

भारतीय संविधानाचा विजय असो!

­

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज ‘भारतीय संविधान दिन’ राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन संपन्न झाले. प्रसंगी २६/११ मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निष्पाप नागरिकांना मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

  •  

भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया म्हणजे आपल्या भारताचे संविधान आहे. प्रत्येक भारतीयाला समानतेचा अधिकार आज केवळ संविधानामुळे प्राप्त झाला आहे.

या कार्यक्रमास कोषाध्यक्ष तथा आमदार श्री. शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ता श्री. सूरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्ष श्री. निखिल ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेश घुले, प्रदेश सरचिटणीस श्री. लतीफ तांबोळी, सह कोषाध्यक्ष श्री. संजय बोरगे, प्रदेश सचिव श्री. दत्ता आवाड, मुंबई महिला अध्यक्षा सौ. आरती साळवी तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
=====


Spread the news

You may also like

error: Content is protected !!