*उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचा बुधवारी कोल्हापूरातील व्यापारी-उद्योजकांसमवेत संवाद*

Spread the news

*उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचा बुधवारी कोल्हापूरातील व्यापारी-उद्योजकांसमवेत संवाद*

­

 

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी व व्यावसायिक यांच्या विविध समस्या, अडचणी तसेच उद्योग-व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्याच्या उद्देशाने *महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई* व *कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज* यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या *बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ वा. मधुसुदन हॉल, हॉटेल पॅव्हेलियन, कोल्हापूर* येथे *“उद्योग संवाद कार्यक्रम”* आयोजित केला आहे.

  •  

या कार्यक्रमामध्ये उद्योजक व व्यापारी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री *ना. उदयजी सामंत प्रमुख पाहुणे* म्हणून व *सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर,* *राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे* हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमास चंदुकाका सराफ ज्वेल्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

तरी या उद्योग संवाद कार्यक्रमास कोल्हापूरातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन *महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र माणगावे* व *कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे* यांनी पत्रकाव्दारे केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!