Spread the news

*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे*
*शनिवारी ‘अर्थ अवर’चे आयोजन*
३० हजारहून अधिक स्ट्रीट लाईट्स १ तास रहाणार बंद

कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागच्यावतीने शनिवारी (दि. २२) ‘अर्थ अवर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी रात्री १ तास विजेची उपकरणे बंद ठेवून वीज बचत व पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संतोष चेडे व डीन स्टुडंट्स अफेअर डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

उपक्रमाचे समन्वयक प्रा. योगेश चौगुले म्हणाले, कोल्हापूर शहरातील आय. आर. बी. अंतर्गत रस्त्यावरील बल्ब, हायमास्ट दिवे व एल.ई.डी. असे ३०,००० हून अधिक पथदिवे शनिवारी सायंकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत बंद राहणार आहेत. तसेच डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे बिंदू चौक येथे रात्री ७:३० वा. पणत्यांपासून ‘अर्थ अवर’चा ६० हा लोगो तयार करण्यात येणार आहे. शहरात पथदिवे, घरगुती बल्ब बंद ठेवून नागरिकांनाही ‘अर्थ अवर २०२५’मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

  •  

उपक्रम यशस्वी करण्यासाठी एन. एस. एस. विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!