माई ह्युंदाईच्या सांगली व कोल्हापूर येथील शोरूम्सना ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या भेटी

Spread the news

माई ह्युंदाईच्या सांगली व कोल्हापूर येथील शोरूम्सना ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडच्या उमेश नारायण चंद्रात्रे, झोनल बिझनेस हेड (वेस्ट झोन), डॉक जुं ह्वांग (झोनल बिझनेस को- ordinator), अजय शर्मा, रिजनल सेल्स मॅनेजर (WRO-3) अक्षय पैलवान (एरिया सेल्स मॅनेजर), स्वप्नील शिंदे, मॅनेजर (डीलर्स नेटवर्क डेव्हलपमेंट)
या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे, डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले, माई ह्युंदाई सांगलीचे जनरल मॅनेजर सतीश पाटील, माई ह्युंदाई कोल्हापूरचे जनरल मॅनेजर विशाल वडेर यांनी ह्युंदाई मोटर्सच्या अधिकाऱ्यांचं स्वागत केलं. पाहुण्यांना फेटा बांधून औक्षण करण्यात आलं.

यावेळी बाकू (अझरबैजान) येथे माई ह्युंदाई ग्रुपला मिळालेली “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” ट्रॉफी मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांच्याकडे सुपूर्त केली. या भेटीदरम्यान त्यांनी सांगली व कोल्हापूर येथील शोरूम्स, वर्कशॉप्स यांची पाहणी केली. यावेळी माई ह्युंदाईमधील कर्मचार्यांसोबत संवाद साधून एकंदरीत स्थानिक बाजारपेठेचा फील जाणून घेतला. भविष्यात ह्युंदाई मोटर्सच्या विविध योजनांसंदर्भात त्यांनी सर्वांशी संवाद साधला. माई ह्युंदाईच्या एकूणच कामकाजाबाबत या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..


Spread the news

You may also like

error: Content is protected !!