ट्रॅव्हल एजंट असोसिएशन कोल्हापूर च्या वतीने पहलगाम दहशतवाद हल्ल्याचा निषेध
कोल्हापूर प्रतिनिधी
काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या अमानवीय अतिरेकी हल्यात मृत्यू झालेल्या निश्पाप भारतीय नागरिकांना . ट्रॅव्हल एजंट असोसिएशन कोल्हापूर यांच्यावतीनेभावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महावीर गार्डन येथील हुतात्मा पार्क टाक असोसिएशनच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा निषेध व्क्त करण्यात आला.
दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आले. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नसून देशावर असल्याचे मत, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम वराडे यांनी व्यक्त केले. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना व हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना या दुःखातून सावरण्यास ईश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी महावीर गार्डन परिसरात पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला. आपापल्या परीवारासोबत आयुष्यातील काही आनंदी क्षण घालण्यासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांचा जीव घेऊन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करुन धडा शिकवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विनोद कोभोज,
सचिव रवी पोतदार,
खजानिस संजय गांधी
व संचालक सचिन सावंत, अमित चौकले, नवनाथ सुर्वे, सतीश दळवी, इम्रान मुल्ला
तसेच अनेक सभासद वर्ग
दिशा ट्रॅव्हलचे पत्रकार तानाजी पवार, दिनेश वालावलकर, विवेक महाजन, मनीष आणि कस्तुरी कट्टी, कृष्णराव माळी आणि त्यांचे सहकारी, राजू नन्नवरे,
तसेच महावीर गार्डन मॉर्निंग व ग्रुपचे सदस्य श्रीयुत शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणात या निषेध सभेमध्ये हजर होते..