खाजगी प्राथ.शिक्षक पतसंस्थेला राष्ट्रीय सहकार रत्न संस्था गौरव पुरस्कार प्रदान ..
कोल्हापूर :सहकार क्षेत्रामध्ये उत्तम संस्था चालवून समाजापुढे एक आदर्श ठेवल्यामुळे नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था कोल्हापूर या संस्थेला “राष्ट्रीय सहकारत्न संस्था गौरव पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले .हा कार्यक्रम सांखळी ‘गोवा येथे संपन्न झाला . माजी केंद्रीय कायदामंत्री व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री विराप्पा मोहिली , माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर , माजी खास .बॅरिस्टर अमरसिंह पाटील , इजिप्तच्या उद्योगपती एलिजाबेथ लिऑन ,
फौंडेशनच्या चेअरमन व मलेशियाच्या उद्योगपती व
डॉ सीमा इंग्रोळे , कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे हे प्रमुख असलेल्या निवड समितीने कर्नाटक , महाराष्ट्र , गोवा ,दिल्ली व गुजरात या राज्यातून आलेल्या निवडक पुरस्कारातून खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती .
रविंद्र भवन सांखळी गोवा येथे झालेल्या अत्यंत दिमाखदार सोहळ्यात कर्नाटकचे जिल्हा कमाडंट अरविंद घट्टी व गोवा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वित अधिकारी प्रशांत नाईक , कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी सांखळी (गोवा)चे सरपंच सहदेव सुवरे , उपसरपंच अजित कदम , जनसंपर्क अधिकारी परशराम
वड्डर हे मान्यवर उपस्थित . या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांनी शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या .
खाजगी शिक्षक पतसंस्थेच्या वतीने संस्थापक भरत रसाळे , चेअरमन मच्छिंद्र नाळे , व्हा . चेअरमन कृष्णात चौगुले संचालक महादेव डावरे , शिवाजी भोसले
सात्तापा कासार ,
सर्जेराव नाईक व व्यवस्थापक सदाशिव साळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला .
यावेळी बोलताना कर्नाटकचे जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी म्हणाले की खाजगी शिक्षक पतसंस्थेने विधायक व कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे त्यामुळेच हा पुरस्कार त्यांना मिळालेला असून यातून प्रेरणा व प्रोत्साहन घेऊन आपल्या हातून सर्वांगीण विकासाचे मौलिक कार्य घडावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या .तर गोवा राज्याचे अकाउंटंट ऑफिस प्रशांत नाईक म्हणाले की संस्थेचे कार्य आदर्श असलेनेच ते या पुरस्कारासाठी पात्र आहेत . कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे म्हणाले की ‘ खाजगी शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक भारत रसाळे यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेचे कार्य मी जवळून पाहिलेले आहे ए .क आदर्शवत संस्था म्हणून महाराष्ट्रात या पतसंस्थेचा लौकिक आहे . यावेळी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या निवड समितीने आमच्या खाजगी शिक्षक पतसंस्थेस राष्ट्रीय सहकाररत्न संस्था पुरस्कार दिले बद्धल व दर्जेदार कार्यक्रम घेतले बद्दल संयोजन कमेटीचे आभार मानले .मुख्याध्यापिका अर्चना गुरव यांनी आभार मांडले तर सूत्रसंचालन नामदेव चौगुले यांनी केले . या कार्यक्रमाच्या पूर्वी पतसंस्था पदाधिकाऱ्यांना फेटे बांधून हलगी व तुतारीच्या निनादात वाजत गाजत समारंभस्थळी नेण्यात आले