*अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनमध्ये शिक्षण विचारांचा जागर*
*मुख्याध्यापक संघाचे दिमाखदार कृतीसत्र*
कोल्हापूर :काळाच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना तंत्रसिद्ध शिक्षण देण्यात मुख्याध्यापक संघाने पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन वाठार तर्फ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कृती सत्राचे आयोजन केले होते तीन सत्रात पार पडलेल्या या कृतीसत्रात विविध शैक्षणिक विषयांचा जागर करण्यात आला विधान परिषदेचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर आमदार अशोकराव माने, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने , मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष बीजी बोराडे, विना अनुदान कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आर. वाय. पाटील, आर . वाय मोरे यांचे विद्यार्थीनींनी औक्षण केले .विधान परिषदेचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते कृती सत्राचे उद्घाटन करण्यात आले . प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . उपस्थित मान्यवरांचा सत्कार आमदार जयंत आसगांवकर आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला . स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी केले . आपल्या मनोगतात त्यांनी मुख्याध्यापक संघाच्या उपक्रमाचा आणि कार्याचा आढावा घेतला . विजयसिंह माने यांनी आपल्या मनोगतात . विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवीन आव्हानांना मुख्याध्यापकांनी सामोरे जावे असे सांगितले . शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी हे कृती सत्र राज्याला दिशादर्शक ठरेल असे सांगितले . आमदार अशोकराव माने यांनी शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवू असे सांगितले . कुलसचिव डॉ. व्ही . एन . शिंदे यांनी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना शिक्षकाला मोठं करण्यात मुख्याध्यापकाचा हात असतो असे सांगतानाच पाठयपुस्तकाशिवाय अन्य साहित्य वाचणारा शिक्षक संशोधनाअंतीच सापडतो अशी खंत व्यक्त केली. शालेय शिक्षण ज्यावेळी जीवन शिक्षण होईल त्याचवेळी शिक्षण सार्थकी लागेल असे सांगून विविध शैक्षणिक संदर्भ दिले .*
*कृतीसत्राच्या दुसऱ्या सत्रात आमदार विनय कोरे यांचा सत्कार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहूल पोवार यांनी केला तसेच शिक्षक नेते दादा लाड तसेच कृती समितीचे अध्यक्ष बाबा पाटील यांचा सत्कार मिलिंद पांगिरकर यांनी केला . मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेतील विजेत्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार दादा लाड आणि विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला . आपल्या मनोगतात डॉ. विनय कोरे यांनी एका गावात तीनतीन शाळांची मंजूरी पाहून या फसवाफसवीत कोण आघाडीवर होते याचा शोध घ्यावयास हवा असे विधान केले . एकीकडे शाहूवाडीसारख्या दुर्गम भागात सातवीनंतर वाड्यावस्त्यांवरील सहा हजार विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर जातात हे खेदजनक आहे . वेगाने होणारे बदल शिक्षणसंस्थांमध्ये येऊ पहाताहेत .एआय तंत्रज्ञानाने अचूक पेपर तपासता येतात हे सिद्ध झाले आहे . काळाच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना तंत्रसिद्ध शिक्षण देण्यात मुख्याध्यापक संघाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले . शिक्षक नेते दादा लाड यांनी आपल्या मनोगतात कृतीसत्र दोनदिवशीय असावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच एन .एम .एम .एस . परीक्षेसाठी मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापकांची कार्यशाळा घ्यावी अशी विनंती केली . याप्रसंगी कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सागर चुडाप्पा, संजय पाटील, जितेंद्र म्हैशाळे यांचेसह जिल्ह्यातील सातशेहून अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते .* सागर माने यांनी सूत्रसंचालन केले